शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

जिल्हा परिषद सीईओ विश्वजित माने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:50 IST

ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा

अहमदनगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी हा ठराव मांडण्याची घोषणा गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत केली होती. आजच्या सभेत त्या ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. माने यांनी जिल्ह्याच्या विकासात खीळ घातली. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर व्हायलाच हवा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्याला सर्वांनी बाके वाजवून पाठिंबा दिला. माने यांच्यामुळे कामं झाली नाहीत. त्यांनी बदल्यांमध्ये गैरसोयी केल्या. पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या तीन दिवस चालल्या. त्यामागे काय कारण?, असाही सवाल सदस्यांनी विचारला.भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले, 'माने यांनीच ही वेळ ओढवून घेतली. लोकप्रतिनिधींना माने यांच्यामुळे कामे करता येत नाही. सीईओ यांनी अपंग जवानांच्या पत्नींना सोयीची बदली देता येत असतानाही दिली नाही. महिलेला न्याय मिळावा, अशी सर्वांची भावना आहे. माने यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सदस्यांनी सांगितलेली कामे अधिकारी करीत नाहीत. मात्र त्यांची कामे रात्री 11 वाजेपर्यंत करतात. असा दूजाभाव नसावा. या ठरावाला आमचा पाठिंबा आहे.'पालकमंत्री राम शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्यामध्ये माने यांच्या वरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर विखे यांनी मांडलेला अविश्वास ठराव सर्व सदस्यांनी मंजूर केला. या ठरावामुळे पालकमंत्री राम शिंदे यांची जिल्हा परिषदेत पिछेहाट झाली आहे. माने यांच्यावर अविश्वास ठराव येणार असल्याची कल्पना असल्यानेच पालकमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी निर्देश देऊन माने यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.