शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा सभापती, नगरसेवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 13:37 IST

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती मुदस्सर शेख याला सोमवारी तोफखाना पोलिसांनी अटक केली.

अहमदनगर: खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती मुदस्सर शेख याला सोमवारी तोफखाना पोलिसांनी अटक केली़शहरातील सर्जेपुरा परिसरात १५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आरिफ शेख व बहुजन समाज पार्टीचा नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. त्यातून दगडफेक झाली. या घटनेत चार जण जखमी झाले होते़ याप्रकरणी पोलिसांनी दिलेली फिर्याद व परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ही घटना घडल्यापासून मुदस्सर शेख फरार होता़ सोमवारी मुदस्सर याच्यासह याच गुन्ह्यातील शोएब शेख पोलिसांसमोर हजर झाले़ त्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांना मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ दरम्यान या गुन्ह्यातील दोन्ही गटातील आरोपी अद्याप फरार आहेत़ मुदस्सर शेख हे सध्या महापालिकेत स्थायी समितीचे सभापती आहेत.दरम्यान सभापती शेख यांना अटक झाल्याने महापालिकेतील अंदाजपत्रक आणि स्थायी समितीच्या सभाही लटकणार आहेत. स्थायी समितीच्या ज्येष्ट सदस्याच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचा आणखी एक मार्ग आहे.नगरसेवकाला अटकअहमदनगर : पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यांना मारहाण करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील नारायण त्रिंबके (वय ४४ रा़ संदेशनगर, वसंत टेकडी,नगर) याला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़मागील भांडणातून गुन्हा दाखल केल्याच्या रागातून त्रिंबके व इतर सहा जणांनी १२ मे रोजी पोलीस कर्मचारी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली होती़ या घटनेनंतर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात त्रिंबके याच्यासह अमित गाडे, प्रताप गायकवाड व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून त्रिंबके फरार होता़ सोमवारी त्रिंबके हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार पोलीस हेड कॉस्टेबल मन्सूर सय्यद, पोलीस नाईक संदीप घोडके, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे, संतोष लोढे, रविंद्र कर्डिले यांच्या पथकाने त्रिंबके याला अटक केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस