मांडवगण : घोगरगाव (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन पंढरीनाथ उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच सोमनाथ उगले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच बाळासाहेब उगले अध्यक्षस्थानी होते. ग्रा. पं. सदस्य सोमनाथ उगले, सुरेश तरटे, सोनाली तरटे, अनिता गारुडकर, राहुल चारूडे, आशाबाई शिंदे आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक डी. आर. वाघ यांनी काम पाहिले. यावेळी सेवा संस्था अध्यक्ष तानाजी बोरुडे, परशुराम गुंजाळ यांनी उगले यांचा सन्मान केला.
खरेदी-विक्री संघाचे संचालक उत्तमराव तरटे, बाजार समिती उपसभापती संजूकाका महांडुळे, कुकडी कारखान्याच्या उपाध्यक्षा ललिता उगले, बिभीषण उगले, संदीपान शेटे, संपत तरटे, भीमराव उल्हारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा पुष्पा डोके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सविता घोडके, राजेंद्र तरटे, मारुती शिंदे, गवाजी राऊत, आदिक उगले, आप्पासाहेब बोरुडे, ज्ञानदेव उगले, डॉ. गुंजाळ, जालिंदर उल्हारे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
----
०८ घोगरगाव