शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

कर्जत तालुक्यात निरव मोदींचा बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 12:33 IST

कर्जत येथे निरव मोदी यांनी खंडाळा येथे सुरू केलेल्या सोलर प्रकल्प हा माळढोकसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे उभा केला असून या जमिनीचा वापर बिगरशेती न करताच व्यवसायासाठी सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देकर्जत येथे निरव मोदी यांनी खंडाळा येथे सुरू केलेल्या सोलर प्रकल्प हा माळढोकसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे उभा केला असून या जमिनीचा वापर बिगरशेती न करताच व्यवसायासाठी सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे. खंडाळा येथील डोंगरावर खरेदी केलेल्या जागेवर निरव मोदी यांनी २०११ मध्ये फायर स्टोन, डायमंड प्रा. लि. या कंपनीच्या नावावर सोलर प्रोजेक्ट सुरू केला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे शेकडो एकर जमीनीचा समावेश आहे. ही जमीन त्याने स्वत:च्या आणि त्याची फायर स्टोन कंपनी यांच्या नावे खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

मच्छिंद्र अनारसेकर्जत : आघाडी सरकारच्या काळात माळढोकचे आरक्षण असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव पुढे करून खंडाळा येथील सौर ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीरपणे उभारला. येथील वीज खरेदी करार राज्य सरकारबरोबर झाला, तेव्हापासून प्रत्येक महिन्याला लाखो युनिट वीज पुरवठा केला जातो आहे. त्याची बिले अदा केली जात आहेत. याचे गौडबंगाल काय? याबद्दल कर्जतकरांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.कर्जत येथे निरव मोदी यांनी खंडाळा येथे सुरू केलेल्या सोलर प्रकल्प हा माळढोकसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे उभा केला असून या जमिनीचा वापर बिगरशेती न करताच व्यवसायासाठी सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे. निरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेमध्ये ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्याने देशातील व परदेशातील इतरही काही बँंकांना फसवले आहे. तो परदेशात पळाला असला तरी सरकारने त्याच्या देशातील सर्व मालमत्तांवर टाच आणण्यास सुरवात केली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे शेकडो एकर जमीनीचा समावेश आहे. ही जमीन त्याने स्वत:च्या आणि त्याची फायर स्टोन कंपनी यांच्या नावे खरेदी केल्याचे उघड झाले आहे. ही जमीन व सोलर प्रकल्प ईडीने सील केला आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर निरव मोदी व कर्जत कनेक्शनबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकजण खंडाळा येथे जाऊन मोदीच्या जागेची पहाणी करीत आहेत.

सौर उर्जा प्रकल्प सुरवातीपासूनच वादात

खंडाळा येथील डोंगरावर खरेदी केलेल्या जागेवर निरव मोदी यांनी २०११ मध्ये फायर स्टोन, डायमंड प्रा. लि. या कंपनीच्या नावावर सोलर प्रोजेक्ट सुरू केला आहे. यामध्ये जमीन खरेदी करण्यापासून प्रकल्प उभा करणे, औद्योगिक परवाना नसणे येथपासून तर तयार केलेली वीज सरकारला विकणे या सर्वच बाबींमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत हा प्रकल्प चालवण्यात आला आहे. यामध्ये माळढोक आरक्षण येथील सर्व गटामध्ये असतानाही या जागेवर त्यांनी हा प्रकल्प उभा कसा केला? केवळ उभा केला नाही तर तो ७ वर्षापासून आजही राजरोसपणे सुरू कसा? हा प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा हा प्रकल्प आहे असे वारंवार सांगितले जात होते. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी येथे कारवाई केली नाही व शहानिशा केली नाही हे मोठे आश्चर्य आहे.

..... तर आज ही वेळ आली नसती

खंडाळा येथील ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असतानाच माळढोक पक्षी आरक्षण उठविण्यासाठी लढा देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी सर्वात प्रथम हा प्रकल्प बेकायदेशीर उभा रहात आहे याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र कंपनी व महसूलचे अधिकारी यांनी फक्त कागदी घोडे नाचवले. त्याचवेळी कारवाई झाली असती तर आज ही वेळ आली नसती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNirav Modiनीरव मोदीKarjatकर्जत