शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

निलेश लंके यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही : राधाकृष्ण विखे पाटील

By साहेबराव नरसाळे | Updated: June 15, 2023 18:05 IST

आमदार निलेश लंके यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात.

अहमदनगर : आमदार निलेश लंके यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात. ते पहिल्यांदा निवडून आले आहेत. मला वाटतं त्यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही. त्यांनी बेताल वक्तव्य थांबविली पाहिजेत, अशी टीका महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

 जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या जोडीदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वारकऱ्यांवरील झालेल्या लाठीहल्ल्यात पारनेरमधील एक वारकरी जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून, लंके यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत विखे यांना पत्रकारांनी विचारले असता, लंके यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही, असे वक्तव्य विखे यांनी केले. 

  नवीन वाळू धोरण झाल्यानंतर अनेक लोकांना वाळू मिळत नाही. याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, वाळूबाबत अनेक वर्षांपासून किडलेली व्यवस्था अस्तित्वात होती. आता आम्ही ही व्यवस्था बदलेली आहे. पण मागणी आणि पुरवठा यातील तफावत का हे मला अद्याप समजलेले नाही. मागणी आणि पुरवठ्याबाबत अद्याप ताळमेळ बसलेला नाही. त्यामुळे प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. वारकऱ्यांचा डाटा आपल्याकडे आत्तापर्यंत कधीही नव्हता. आता ही माहिती प्रशासनाने घेतली असून, प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा पुरविल्या आहेत. वारकऱ्यांना हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. त्यावर त्यांना कोणतीही मदत पुरविली जाईल, असे विखे यांनी सांगितले.काँग्रेसची ताकद दोन जागांपुरतीच

काँग्रेसकडून होत असलेले जागांची मागणी अवास्तव आहे. राज्यात काँग्रेस पक्ष शिल्लक राहिलेला नाही. राज्यात पक्ष दिसत नाही. मात्र, त्यांचे  ठराविक पुढारी दिसत आहेत. त्यांची ताकद फक्त दोन जागांपुरतीच आहे, अशा शब्दात विखे यांनी काँग्रेसवर टीका केली.