शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:07 IST

जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा बुधवारी झाली.

ठळक मुद्दे नगरपालिकेवर पकड घट्ट : पालकमंत्र्यांच्या कौशल्याने चुरशीवर पडदा

जामखेड : जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा बुधवारी झाली. त्यापाठोपाठ उपनगराध्यक्षपदी फरिदा असिफखान पठाण यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी तब्बल १३ जण इच्छुक होते. त्यामुळे यासाठी मोठी चुरस होती. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांनी मोठ्या कौशल्याने दोन्ही निवडी बिनविरोध करीत नगरपालिकेवर आपली पकड घट्ट केली.निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडीसाठी दुपारी २ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. २७ जुलैस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. मुदतीत घायतडक यांचेच दोन अर्ज दाखल होऊन मंजूर झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा तेवढी शिल्लक होती. विशेष सभा सुरू होताच निवडणूक अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदासाठी घायतडक यांचेच उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.पालकमंत्री राम शिंदे यांनी आदेश दिल्याप्रमाणे फरिदा असिफखान पठाण यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नाराज झालेल्या वैशाली ज्ञानेश्वर झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी विरोधी गटाकडून कमल महादेव राळेभात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे वातावरण तापले होते. परंतु दोन तासाच्या कालावधीत चर्चा, बैठका झाल्या. दोन वाजता नगराध्यक्षपदांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल तीन उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकाºयांनी छाननी करून वैशाली झेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दोन वेगवेगळ्या सह्या असल्याने तो उमेदवारी अर्ज नामंजूर केला. पठाण व राळेभात यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले. राळेभात यांनी माघार घेतल्यामुळे उपनगराध्यक्षपदी पठाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केले.नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड बिनविरोध जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून फटाक्यांची आतीषबाजी केली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री राम शिंदे व नगरसेवकांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवड केल्याबद्दल नगराध्यक्ष घायतडक यांनी पालकमंत्री व नगरसेवकांचे आभार मानले. मावळत्या नगराध्यक्ष अर्चना राळेभात, मावळते उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, सर्व नगरसेवक, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, प्रविण सानप, भाजपचे कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड