निघोज : निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्योजकांबरोबरच सर्वसामान्यांनाही अडचणीच्या काळात आधार मिळत आहे, असे गौरवोद्गार आमदार नीलेश लंके यांनी काढले.
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या लोणी मावळा (ता.पारनेर) येथील शाखेचे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन जागेत स्थलांतर झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद म्हणाले, संस्थेच्या १३ शाखा असून, त्या कोअर बँकिंग झालेल्या आहेत. संस्थेच्या ३१ मार्च २०२१अखेर संस्थेच्या ठेवी १५३ कोटी २० लाख, कर्ज ९७ कोटी ४७ लाख, गुंतवणूक ८८ कोटी ३० लाख, निधी २१ कोटी ५४ लाख असून, निव्वळ नफा तीन कोटी २५ लाख झाला आहे. सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार यांचा संचालक मंडळावर असणाऱ्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र सरडे, पारनेर तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, लोणी मावळ्याचे सरपंच वंदना मावळे, उपसरपंच गणेश मापारी, निघोज ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, विठ्ठल कवाद, चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, रामदास वरखडे, दामू लंके, बहिरू कळसकर, भिवाजी रसाळ, सुनील मेसे, वैशाली कवाद, लताबाई कवाद आदी उपस्थित होते. शांताराम कळसकर यांनी आभार मानले. (वा.प्र.)
--
१५ निघोज लंके
निघोज नागरी पतसंस्थेच्या लोणी मावळा शाखेचे नव्या जागेत स्थलांतर झाले. यावेळी आमदार नीलेश लंके व इतर.