शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यातील १३३ गावात नवीन रास्तभाव दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:31 IST

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत धान्याचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३३ गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत धान्याचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३३ गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत असून लवकरच दुकाने सुरु होणार आहेत. पारनेर व अकोेले तालुक्यात सवार्धिक २३ तर अहमदनगर शहरात सर्वात कमी २ दुकाने सुरु करण्यात येणार आहे.जिल्ह्यात नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. शहरामध्ये बुरुडगल्ली, ब्राम्हणगल्ली (भिंगार), नगर तालुक्यातील सांडवे, कोळपे आखाडा, उदरमल, वाळकी, पारगाव मौला या गावामध्ये नवीन दुकाने सुरु केली जाणार आहेत. शेवगाव तालुक्यात निंबे, नांदूरविहीरे, आखेगाव तितर्फा, ठाकूर निमगाव, शहरटाकळी तर श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, येळपणे, एरंडोली, श्रीगोंदा, वेळू, कौठा, आनंदवाडी या गावांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील कापरेवाडी, गुरवप्रिपी, जामखेड तालुक्यातील गुरेवाडी, आपटी, पारनेर तालुक्यातील गाडीलगाव, सुलतानपूर, पळवे बु. मुंगशी, वाघुंडे खु., यादववाडी, बहिरोबावाडी, पिंपळगाव तुर्क, वेसदरे, गारगुंडी, भोंद्रे, कारेगाव, डोंगरवाडी, मोरवाडी, शेरी कासारे, रेनवडी, गारखिंडी, पाडळी दर्या, जाधववाडी, वडुले, घाणेगाव, हकीकतपूर, कासारे या २३ गावांचा समावेश आहे. नेवासा तालुक्यात उस्थळ खालसा, बोरगाव, माळेवाडी, वंजारवाडी, खेडले परमानंद, झापवाडी, सांगवी, माळेवाडी दु. जळके खु. गोयगव्हाण, शिंगवे तुकाई, गोपाळपूर, फत्तेपूर, संगमनेर तालुक्यातील काकडवाडी, अमृतनगर, बांबळेवाडी, कणसेवाडी, चिंचेवाडी, वडगाव पान, पारेगाव खु. वडझरे बु., राहुरी तालुक्यातील गुंजाळे, धामोरी बु., खंडाबे बु., डिग्रस (म.फुले कृषी विद्यापीठ), राहुरी बु., गडदे आखाडा, चिंचाळे, जांभूळबन, पिंप्री वळण, धानोरे, जातप, माळेवाडी या गावांचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्यात श्रीरामपूर शहरात ८, कडीत खु., एैनतपूर, हरेगाव, कोपरगाव तालुक्यातील शहापूर, धोंडेवाडी, बहादराबाद, सोयगाव, ब्राम्हणगांव, सोनारी, डाऊच बु., कोपरगाव शहरात एक दुकान नवन सुरुवात होणार आहेत.अकोले तालुक्यातील रणद बु., मनोहरपूर, डोंगरवाडी, पेंडशेत, कोंदणी, मुरशेत, सावरकुटे, चितळवेढे, भंडारदरा, माळेगाव, जायनावाडी, ढोकरी, पुरुषवाडी, साकीरवाडी, पाभुळवाडी, चैतन्यपूर, तिरडे, आंबेवंगण, टिटवी, शेणित खु., मान्हेरे, मोरवाडी, फोफसंडी या गावांचा समावेश आहे. राहाता तालुक्यात पिंपळस, अस्तगाव, शिर्डीमध्ये ३ दुकांनाचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यात किर्तनवाडी, पारेवाडी, बैजुबाभुळगाव, सामठाणे खु. ढाकणवाडी, सामठाणे नलावडे, सांगवी बु., या गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.त्याच गावातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना अर्ज करता येणार आहेत. जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे अर्ज करता येणार आहे.तालुकानिहाय गावांची संख्याअहमदनगर शहर २नगर तालुका -५शेवगाव ५,श्रीगोंदा ७कर्जत २,जामखेड २,पारनेर २३नेवासा १३,संगमनेर ८,राहुरी१२श्रीरामपूर ११कोपरगाव ८अकोले २३,राहाता ५पाथर्डी ७

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी