शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नेवासा फाटा परिसरात कापसाच्या व्यापा-याला कारसह १३ लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:20 IST

पोलीस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील कापूस व्यापा-याचा वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

नेवासा : पोलीस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील कापूस व्यापा-याचा वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत नेवासा पोलिसांत व्यापारी युनूस बुगण शेख (रा.वळण, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० डिसेंबर रोजी नेवासा भागातील कापूस व्यापा-यांना देण्यासाठी माझी गाडी मारुती व्हिटारा ब्रिझा क्रमांक एम.एच. १७, बी.व्ही.-१३५२ यामध्ये ५ लाख रुपये घेऊन आलो होतो. नेवासा खुर्द भागातील व्यापारी विजय राशीनकर यांच्याकडे माझी कापसाची गाडी भरत होती, मात्र कापूस कमी पडल्याने उस्थळ दुमाला येथील दुसरे व्यापारी रामेश्वर दिगंबर सिदलंबे यांच्याकडे जाऊन कापसाची बोलणी करून कापसापोटी त्यांना १ लाख रुपये दिले. नेवासा फाटा येथून नेवासाकडे येण्यासाठी निघालो असता रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट व जर्किंन तसेच डोक्यात हेल्मेट घालून मोटारसायकलवर बसलेल्या एक इसमाने गाडीला हात करून बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितले. त्यांच्या अंगातील कपड्यावरून वाहतूक पोलीस असल्याचे वाटल्याने गाडीचा वेग कमी केला. मात्र त्याच्या जवळ जात असताना हा पोलीस नसावा असा अंदाज आल्याने गाडीचा वेग पुन्हा वाढविला. त्यानंतर सदर इसमाने मोटारसायकल क्रमांक एम.एच. १९, ए.एस.-१५५३ यावरून पाठलाग करून गाडी बाजूला लावायला सांगितले. गाडी चालवताना फोनवर बोलतो, असे म्हणत माझ्याकडे लायसन्स व कागदपत्राची मागणी केली. माझ्याकडे कागदपत्र असल्याचे सांगितले. परंतु लायसेन्स नाही असे सांगताच गाडी पोलीस ठाण्यात न्यावी लागेल, असे सांगत हेल्मेट काढून खिशातील पोलीस टोपी माझ्या गाडीत टाकून स्वत: ड्रायव्हर सीटवर बसून मला मोटारसायकल मागे घे व तू पलीकडून येऊन गाडीत बस असे सांगितले. मी मागे गेलो असता तो गाडी घेऊन भरधाव वेगाने नेवाशाच्या दिशेने निघून गेला. गाडीची किंमत ९ लाख तसेच ४ लाख रुपये रोख अशी एकूण १३ लाख रुपयांची लूट झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा