शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा : अवैध वाळू उत्खननप्रकरणी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:19 IST

तालुक्यातील मुरमे व बकुपिंपळगाव शिवारात प्रवरा नदीपात्रात वाळू उत्खनन करणारे दोन जेसीबी व एक ट्रॅक्टर असा

नेवासा : तालुक्यातील मुरमे व बकुपिंपळगाव शिवारात प्रवरा नदीपात्रात वाळू उत्खनन करणारे दोन जेसीबी व एक ट्रॅक्टर असा ३६ लाखांचा मुद्देमाल नागरिकांच्या साहाय्याने महसूल पथकाने जप्त केला. याबाबत कामगार तलाठी अण्णा भीमराज दिघे यांनी दिलेल्या फियार्दीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरमे व बकुपिंपळगाव शिवारात नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणारे जेसीबी नागरिकांनी पकडले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दूरध्वनी द्वारे दिल्यानंतर कामगार तलाठी दिघे, मंडलाधिकारी सुनील लवांडे, कोतवाल रामभाऊ मोरे हे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्या ठिकाणी गेले असता तेथे दोन जेसेबी व एक ट्रॅक्टर नदी पत्रात उभे होते. त्यावेळी अंकुश बंदिवान, धनु काशीद, सुनील डौले, राहुल थोरात, प्रदीप पटारे व इतर नागरिक तेथे होते. सदरचे जेसेबी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्खनन केलेली वाळू ही ट्रॅक्टर मध्ये भरण्याच्या तयारीत होते. या ठिकाणाहून एम एच २० एटी ९७०७ व ६१६९ क्रमांकाचे दोन ढंपर पळून गेल्याचे सदर नागरिकांनी सांगितले. तसेच जेसीबी व ट्रॅक्टर मालक राजू देवीचंद चरवंडे(परदेशी) व तुषार देवीचंद चरवंडे(परदेशी) यांच्या मालकीचे आहेत. त्यामध्ये दोन जेसेबी ३० लाख रुपये व ६ लाखाचा ट्रॅक्टर असा ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे फियार्दीत म्हटले आहे.दिलेल्या फियार्दीवरून राजू चरवंडे ,तुषार चरवंडे , जेसेबी, ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक व ढंपर वरील अज्ञात चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर