नेवासा : नेवासा शहरातील स्टेट बँकेतून भर दिवसा अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.ग्राहकाने जमा केलेली रक्कम कॅशीअरने भारतीय स्टेट बँक शाखेच्या काउंटरवरच ठेवल्याने दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत या रकमेवर डल्ला मारला. वर्दळीच्या ठिकाणी ही बँक आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.
नेवासा : स्टेट बँकेतून भरदिवसा अडीच लाखांची रक्कम लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 15:23 IST