अहमदनगर : ग्रामीण भागातील गरजवंत मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा शक्ती असते. मात्र, परिस्थिती आडवी येते. त्यांना शैक्षणिक मदत केली पाहिजे. त्यातच खरे पुण्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
अकोळनेर (ता.नगर) येथे उपसरपंच प्रतिक शेळके यांनी आमदार लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील गरजवंत दोनशे विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांचे शालेय साहित्य भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय गारुडकर होते.
यावेळी सरपंच दादा कोळगे, उपसरपंच प्रतीक शेळके, पंचायत समिती माजी सभापती नंदा शेंडगे, भगवान भोर, सतीश गायकवाड, राजेंद्र गावखरे, युवराज कार्ले, प्रवीण कोठुळे, राजेंद्र शेळके, आदिनाथ गायकवाड, अंकुश रोकडे, लक्ष्मण ठोकळ, राहुल आढाव, बाबासाहेब जाधव, चंद्रकांत मेहत्रे, बाळासाहेब भोर, विद्या भोर, मुख्याध्यापक सदाशिव साबळे, प्रा.विजय गायकवाड, युवराज गारुडकर, बापूसाहेब मेहत्रे, शीतल शिंदे, वंदना गायकवाड, सुवर्णा सोनवणे, मनीषा पवार उपस्थित होते. लंके म्हणाले, मतदार संघातील अकोळनेर गाव दत्तक घेतले असून, पाच वर्षांत गावाचा विकास करणार आहे.
प्रशांत मेहत्रे, राजेंद्र कोळगे, दादा धस, प्रदीप कोळगे, रामचंद्र जाधव, आबा सोनवणे, अर्जुन सोनवणे, अरुण जाधव, कैलास जाधव, अनिल मेहत्रे, कैलास टुमकर, किशोर जाधव आदी उपस्थित होते.
(वा. प्र.)
---
१४ अकोळनेर
अकोळनेर येथे २०० मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.