शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शेतीतील उर्जास्त्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे- अशोक दलवाई; कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 16:31 IST

भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.

राहुरी  :  भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही.  उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि आत्मा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित किसान आधार संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दलवाई बोलत होते.  डॉ. अशोक दलवाई यांच्या हस्ते शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते. प्रास्ताविक आणि स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. शदर गडाख यांनी केले. दलवाई पुढे म्हणाले, आज संपूर्ण जगाला जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावत आहे. माती व जमिनीतील पाण्याची प्रत खराब झाल्यामुळे आजची शेती धोक्यात आली आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतीतील जैविक घटकांचे अवशेष पुन्हा मातीत मिसळवणे गरजेचे आहे. निसर्गाने मोफत दिलेल्या उर्जास्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करुन उर्जेची गरज भागवली पाहिजे. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार शेती क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करुन कृषी विस्ताराचे धोरण आखत आहे. पीक उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. शिवाजीराव जगताप यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. डॉ. रावश्यान इस्मायलो यांनी आपले मनोगत रशियन भाषेत व्यक्त केले. अनुवाद डॉ.रविप्रकाश दाणी यांनी केला. कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, डॉ. प्रतापराव भोसले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगरु डॉ. रविप्रकाश दाणी, उझबेकिस्तान येथील नमणगन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. रावश्यान इस्मायलो, कामधेनु विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रतापराव भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, डॉ. अशोक फरांदे,  सोपान कासार,  विजय कोते, विद्यापीठ अभियंता  मिलिंद ढोके, सुनीता पाटील, नाथाजी चौगुले उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.भगवान देशमुख यांनी केले. आभार डॉ. अशोक फरांदे यांनी मानले.