शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : राज्य शासनाकडून पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या व विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : राज्य शासनाकडून पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या व विघटन न होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणली आहे. बंदी असूनही कोपरगाव शहरात आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. अशा पिशव्यांचा वापर करणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपरिषदेमार्फत वारंवार कारवाई केली जाते. त्यामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

कोपरगाव शहरात मोठी बाजारपेठ असल्याने अगदीच छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत मोठी दुकाने आहेत. या बाजारपेठेत विविध खरेदीसाठी तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. गेल्या अनेक वर्षांत ग्राहकांनाच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची सवय लागल्याने सेवा म्हणून व्यावसायिकांना ती दुकानात ठेवावीच लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून ५० मायक्रोनच्या वरील प्लास्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर त्यापेक्षा खालची प्लास्टिक पिशवी वापरली तर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे.

यानुसार अनेकवेळा नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली. परंतु, व्यापारी देखील आता ५० मायक्रोनच्या वरील पिशव्या वापरत आहेत. तरीही नगर परिषदेकडून कारवाई केली जाते. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना पिशव्या किती मायक्रोनच्या आहेत हे तपासण्यासाठी कोणतेही यंत्र अथवा तंत्र नगर परिषदेकडे नाही. त्यामुळे चूक असल्यास प्रशासनाने अवश्य कारवाई करावी, अशी भावना व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

.............

असे आहेत शहरातील व्यावसायिक

॰ खासगी व्यावसायिक दुकानदार- १०५७

॰ नगर परिषद गाळे धारक - ६५३

॰ सर्वच प्रकारचे पथविक्रेते - १३६८

॰ आठवडे बाजारातील सर्वच विक्रेते- २१५०

..............

कोपरगावात बहुतांश व्यावसायिक हे ५० मायक्राॅनपेक्षा अधिकच्या प्लास्टिक पिशव्या वापरतात. मात्र, काही पिशव्यांवर फक्त तसा शिक्का मारलेला असतो. तशा पिशव्यांच्या मायक्रोनची आमच्याकडे असलेल्या यंत्राने तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाते.

- सुनील गोर्डे, उपमुख्याधिकारी, कोपरगाव

..........

सिंगल यूज प्लास्टिक पिशवी वापरण्यास समर्थन नाही. परंतु, व्यापारी वर्गाने ५० मायक्राॅनच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास सुरुवात केली आहे. या पिशव्यांचे विघटन होते, असे देखील लिहिलेले असते. नगर परिषदेकडून अशी कारवाई होते, त्यावेळी पिशव्यांची तपासणी करून कारवाई करा म्हटले, तर त्यांच्याकडे तपसणीसाठी कोणतेही यंत्र, तंत्र नसते. त्यामुळे व्यावसायिकांना नियमात असताना देखील कारवाईला सामोरे जावे लागते.

- सुधीर डागा, कार्याध्यक्ष, व्यापारी महासंघ, कोपरगाव