ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने आयोजित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.
नोकरदाराने जेवणाच्या डब्यात बरोबर पुस्तक देखील न्यावे व जेवणाच्या सुट्टीत किमान पाच पाने वाचावीत. जवळपासच्या एखाद्या शाळेत आठवड्यातून एक तास वाचलेल्या पुस्तकाचे वाचन विद्यार्थ्यांसमोर करावे. वाचलेल्या पुस्तकांचे आयुष्यात पुन्हा कालांतराने दुबार वाचन करावे. रुग्णाला भेटायला जाताना एखादे पुस्तक भेट म्हणून द्यावे. विविध समारंभात सत्कारासाठी बुकेऐवजी बुक म्हणजे पुस्तक द्यावे या पाच वाचन संकल्पनांतून आपण येणाऱ्या पिढीलादेखील समृद्ध करू शकू, असे नकासकर म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले. गौरवपत्र व ग्रंथ देऊन प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात गाडेकर यांनी, वाचन चळवळीला बळ मिळावे म्हणून या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा कार्यालयाचा मानस असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले. आभार तांत्रिक अधिकारी हनुमंत ढाकणे यांनी मानले.