शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अकोलेत पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:49 IST

जैवविविधतेचे लेणे व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या अकोले तालुक्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून कात टाकली आहे.

हेमंत आवारीअकोले : जैवविविधतेचे लेणे व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या अकोले तालुक्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून कात टाकली आहे. यातून पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. आदिवासींचा आर्थिकस्तर उंचावण्यास हातभार लागत आहे. दरम्यान पर्यावरणपूरक पर्यटन विकास करण्याची गरज आहे. यासाठी हौशी पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळून निसर्गाची हानी टाळावी, असे निसर्गप्रेमींना वाटते. शिखरस्वामिनी कळसूबाई, रामायणाची साक्ष असलेला आज्यापर्वत, लव-कुश यांचे जन्मस्थळ असलेला कोदनी येथील वाल्मिकऋषींचा तातोबागड, अगस्तीऋषी आश्रम, २६ गड किल्ले, हरिश्चंद्रगड, रतनगड, बित्तमगड, पट्टाकिल्ला, आंबित व्हॅली, कोंबड किल्ला, भैरवगड, दुर्गम फोफसंडी-बिताका आदिवासी पारंपरिक लोककला जतन करणारी खेडी, वनौषधी, रानपक्षी, रानफुल, वन्यजीव जंगल अन् शेखरु, बिबट्या तसेच ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण ही पर्यटनाची बलस्थाने आहेत. आता निळवंडे धरणाची त्यात भर पडली आहे. अकोले तालुका जैवविविधतेसाठी ‘हॉट स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. जंगलात हिरडा, बेहडा, खैर, सादडा, करंज, बांबू, कारवी, आंबा, काजू, फणस, करवंद झाडे दिसतात. खोकर, भेकर, रानमांजर, लांडगा, तरस, साळींदर, रानडुक्कर आदी जंगली प्राणी आढळतात. कोथळे, तोलारखिंड, हरिश्चंद्र रानात राष्ट्रीय पक्षी शेखरू दिसतोच. विश्रामगड परिसरात गिधड, घार, घुबड, वेडा राघू आकाशात घिरट्या घालतात. वाशेरे घाटात मोर फेर धरताना दिसतात. ६२९ वनस्पती, ५१२ रानफुल तर १५७ प्रकारचे पक्षी तालुक्यात असल्याने निर्सगप्रेमींचा सतस राबता आहे. प्रत्येक ऋतूत वेगळेपण दडलेले असून निसर्ग पर्यटन वृध्दिंगत होत आहे. दरम्यान भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवासाठी आलेल्या पर्यटक साम्रद येथील गूढरम्य सांदन दरीची सफर करण्याचा आनंद घेतात. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची अवंता देत भंडारदरा परिसर लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश फुलांनी उजळून निघतो. दिवसभर सांदन दरीची सफर करायची. रात्री काजवे पाहण्याचा आनंद द्विगुणीत करतात.शेकरु दुर्मिळ; बिबटे बागायती क्षेत्राकडेदुर्मिळ होत चालेला ‘शेकरु’ या प्राण्याची संख्या तालुक्यातील हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्यात कोथळ्याच्या रानात पाचपटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अभयारण्य क्षेत्रात केवळ नऊ ‘बिबटे’आढळल्याने जंगलातील बिबट्यांनी आपला मुक्काम बागायती ऊस क्षेत्राकडे वळविला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्यक्षेत्रात वानर, माकड व रानडुक्कर यांच्यासह पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे. तर चिमणी- कावळ्यांची संख्या कमालीची घटली आहे. राष्ट्रीय पक्षी ‘मोर’यांची संख्या ३२ असून रतनवाडीच्या पाणवठ्यावर १० निलगायी तसेच घाटनदेवी पाणवठ्यावर एक ‘रानगवा’आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणी टंचाईचे सावट असताना देखील वन्यजीव विभागाने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करुन पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी धडपड चालू ठेवली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर