शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

राहुरीत हुमणीबाधीत ऊसासह राष्ट्रवादीचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:16 IST

हुमणी बाधीत ऊसासह राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कचेरीवर शासनाच्या विरोधी मोर्चा काढण्यात आला. 

राहुरी : हुमणी बाधीत ऊसासह राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कचेरीवर शासनाच्या विरोधी मोर्चा काढण्यात आला. आठ दिवसात पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला़ मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.राहुरी येथील शनि मंदीरपासून मोर्चाला घोषणा देत मोर्चा काढण्यात आला़ हुमणीग्रस्त ऊस हातात घेत शेतक-यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या़ राहुरी तहसील कार्यालयासमोर आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ सभेत बोलतांना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी शासनाच्या धोरणावर टिका केली़ बोंडअळीची रक्कम मिळाली नाही तर दुस-या बाजुला शेतक-यांना दुधाचे अनुदान मिळाले नाही़ शासन शेतक-यांच्या विरोधी असून त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल़मुळा धरणातुन जायकवाडीला पाणी सोडण्यास नगराध्यक्ष तीव्र विरोध दर्शविला़ वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढू व आंदोलन छेडू पण डाव होणून पाडू असा इशारा दिला़ जायकवाडी पाणी जाऊ देणार अशी घोषणा करणारे आमदार शिवाजी कर्डीले गप्प का असा सवाल तनपुरे यांनी उपस्थित केला़ २०३० सालापर्यंत आमदारकीची स्वप्ने पाहाणा-या लोकप्रतिनिधीला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही तनपुरे यांनी सांगितले़ राहुरी तालुक्यात तयार करण्यात आलेले रस्ते निकृष्ट प्रतिचे असल्याची टिकाही तनपुरे यांनी केली़मोर्चासमोर मुळा प्रवरा इलेक्ट्रीक सोसायटीचे संचालक शिवाजी सागर, शिवाजी कातोरे, रियाज देशमुख, विक्रम गाढे यांची भाषणे झाली़ यावेळी सभापती मनिषा ओहोळ, मधुकर तारडे, रविंद्र आढाव, शिवाजी डौले, प्रकाश भुजाडी, धिरज पानसंबळ, पांडुरंग उदावंत, अनिल कासार, नगरसेवक भिकुशेठ भुजाडी, राजेंद्र बोरकर, शरद धसाळ, सचिन भिंगारदे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी