अकोले : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत सर्व जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व सिध्द करत विरोधी भाजपा-सेना युतीच्या शेतकरी जागृती मंडळास पराभवाची धूळ चारली. आमदार वैभव पिचड गटाने तालुक्यातील सहकारातील ही तिसरी निवडणूक एकहाती जिंकत गुलाल अंगावर घेतला.सोमवारी मतमोजणी झाली. राष्ट्रवादीने ४०० ते ५०० मते अधिक मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला. जि. प. सदस्य परबत नाईकवाडी हे सर्वाधिक ७२८ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ मुरलीधर ढोन्नर यांना ७१० मते, तर लक्ष्मण कोरडे यांना ६६६ मते मिळाली. विरोधक २३७ च्या पुढचा आकडा पार करु शकले नाहीत. राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व मते पुढीलप्रमाणे: भरत देशमाने (६४३), पुंजा वाकचौरे (६२२), रोहिदास भोर (६५३), भाऊसाहेब कासार (६५०), विजय अस्वले (६४१), रावसाहेब वाळुंज (६१५), सुधीर शेळके (५५०), हौसाबाई हांडे (७०७), संगीता गोडसे (६७७), परबत नाईकवाडी (७२८), मुरलीधर ढोन्नर (७१०), बाळासाहेब आवारी (६४९), बाळासाहेब सावंत (६०५), लक्ष्मण कोरडे (६६६), सुभाष वायाळ (५७५), दिलावर शेख (२९५), विजय लहामगे (२६३), निवृत्ती कचरे (४२).
बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व
By admin | Updated: April 19, 2016 00:14 IST