शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये; श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, अकोले, कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:18 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे़ श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल.

ठळक मुद्देतनपुरे, काळे, जगताप, पिचड, ढाकणे मैदानातश्रीगोंद्यात बड्या नेत्यांच्या प्रवेशाची चर्चानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातून नगर जिल्ह्यातील हल्लाबोल यात्रेला गुरुवारी सुरुवात होईल.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल, अशी महिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.विविध मागण्यांसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन हाती घेण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातून ही यात्रा कोपरगावमार्गे नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातून नगर जिल्ह्यातील हल्लाबोल यात्रेला गुरुवारी सुरुवात होईल. तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदनानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.गुरुवारी श्रीगोंद्यासह शेवगाव आणि राहुरी शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात येणार आहे. राहुरी येथे सायंकाळी साडेसात वाजता सभा होणार असून, शिर्डी येथे मुक्काम असणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून, कोपरगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी ४ वाजता सभा होणार आहे. कोपरगावमार्गे यात्रा नाशिकडे रवाना होणार असल्याचे घुले म्हणाले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, सरचिटणीस सोमनाथ धूत आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा विभाजनाबाबत घुलेंची सावध भूमिका

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना घुले म्हणाले, जिल्हा विभाजनाचा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे़ जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय सरकारच्या अखत्यारित आहे. पक्षाची बांधणी सुरू आहे. जुन्या नेत्यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, त्यानुसार रणनीती ठरविली जाईल.

तनपुरे, काळे, जगताप, पिचड, ढाकणे मैदानात

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सक्रिय झाले आहेत. श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप, शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले, नेवासा तालुक्यात विठ्ठलराव लंघे, श्रीरामपूरमध्ये अविनाश आदिक, राहुरीत प्राजक्ता तनपुरे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे, अकोल्यात माजी मंत्री मधुकरराव पिचड हल्लाबोलच्या तयारी लागले आहेत. नगर शहरात आंदोलन नाही़ पण, आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे़ राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदारही हल्लाबोलच्या निमित्ताने सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

श्रीगोंद्यात बड्या नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा

उत्तर महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सुरुवात श्रीगोंद्यातून होत आहे. श्रीगोंदा तालुक्यात आंदोलनाची तयारी सुरू आहे. आंदोलनाच्या वेळी श्रीगोंदा तालुक्यातील दोन बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या श्रीगोंद्यात आहे. त्यांना सोबत घेऊन तालुक्यातील विरोधकांवर हल्लाबोल करण्याची तयारी जगताप यांनी सुरू केल्याचेही बोलले जात आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगर