शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावात राष्ट्रवादी-भाजपमध्ये लढत : नगराध्यक्ष पदासाठी मोहिते-तिजोरेंचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:24 IST

शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष विजयमाला तिजोरे व भाजपच्या राणी मोहिते यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

शेवगाव : शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष विजयमाला तिजोरे व भाजपच्या राणी मोहिते यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले. बुधवार १ आॅगस्टला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.दोन्ही उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रम बांदल तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत तिजोरे व मोहिते यांनी अर्ज दाखल केले. तिजोरे यांच्या अर्जावर सूचक म्हणून मावळत्या नगराध्यक्षा विद्या लांडे, तर अनुमोदक म्हणून मावळत्या उपनगराध्यक्ष यमुनाबाई ढोरकुले यांच्या सह्या आहेत. मोहिते यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाजपच्या गटनेत्या सविता दहिवाळकर, तर अनुमोदक म्हणून शारदा काथवटे यांच्या सह्या आहेत.या निवडणुकीनिमित्त शेवगावातील राजकारण चांगलेच ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नगरपालिकेत आपल्या पक्षाचा झेंडा कायम रहावा, यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने तर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगरपालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकण्यासाठी आमदार राजळे समर्थकांनी आपआपल्या राजकीय हालचाली गतीमान केल्या आहेत. पडद्याआडून डाव प्रतिडाव आखण्यास सुरूवात झाली आहे. एकमेकाच्या गोटातील नगरसेवकांना गळाला लावण्याचे डावपेच सुरू असून त्यास यश येणार काय? सताधारी राष्ट्रवादीच्या गोटात मध्यंतरी नगराध्यक्षावरील अविश्वास नाट्यातून उद्भवलेली नाराजी दूर करण्यास पक्षश्रेष्ठींना यश येऊन सध्याची बारा नगरसेवकांचीआघाडी एकसंघ राहणार की, सत्ताधाºयांमधील मतभेदांचा फायदा उठविण्यात भाजपला यश येणार का? याकडे राजकारण्यांबरोबरच शेवगावकरांचेही लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव