शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे शिवारात जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:19 IST

तळेगाव दिघे भागातील २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची लोखंडी जलवाहिनी निळवंडे गावादरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फुटली.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे भागातील २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची लोखंडी जलवाहिनी निळवंडे गावादरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. प्रवाशांनी यानिमित्ताने पाण्याचे हवेत उडणारे फवारे पाहण्याचा आनंद लुटला. तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे वीस लाभार्थी गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. योजनेच्या वडगावपान शिवारातील साठवण तलावापासून तळेगाव दिघे गावाकडे जमिनीतून गेलेली जलवाहिनी गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास निळवंडे गावादरम्यान फुटली. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे हवेत उडणारे कारंजे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या साईड गटारात पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले. रस्त्याच्या जलवाहिनी फुटल्याचे समजल्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. सदर लोखंडी जलवाहिनी ठिकठिकाणी अत्यंत जीर्ण झाली आहे. जीर्ण जलवाहिनी वारंवार फुटते. त्यामुळे लाभार्थी गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी