अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून जिल्ह्यातील दोन केंद्रावर मतदानास सुरुवात झाली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत मतदान करता येणार असून त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.नाट्य परिषदेवर जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी निवडून दिले जाणार आहेत. या दोन जागासाठी नगरमधून चार उमेदवार रिंगणात आहेत. नगरच्या प्रतिनिधी निवडणुकीत मध्यवर्ती नाट्य परिषदेचे सहकार्यवाह सतीष लोटके व सतीष शिंगटे रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात श्याम शिंदे व उमेश घेवरीकर आहेत. शहरामध्ये ४२५, संगमनेरला १२० तर शेवगावमध्ये १०६ असे ६५१ मतदार आहेत. नवीन टिळक रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नगर व संगमनेरमधील मतदारांना मतदान करता येणार आहे. शेवगावला पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्येही मतदान प्रक्रिया राबविला जात आहे. शेवगावचे उमेश घेवरीकर यांचाही नाट्यक्षेत्रातील काम अतुलनीय आहे. राज्यनाट्य, बालनाट्य, एकांकीका, नाट्यलेखन, लघुपट अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तसेच शेवगाव येथे पार पडलेल्या बालनाट्य संमेलनाचे मुख्य आयोजक म्हणून त्यांनी मोलाची भुमिका पार पडली. सप्तरंग थिएटर्सच्या माध्यमातून ३१ वर्षापासून नाट्यवर्तुळात श्याम शिंदे हे नाव परिचित आहे. राज्य नाट्यच्या अंतिम फेरीतही त्यांनी पारितोषिक मिळविले आहे. तसेच बालनाट्य, लघुपट क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे. सतीष लोटके यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलन सर्वांच्या सहकार्यान यशस्वी पार पाडले. मागील ३६ वर्षापासून नाट्य क्षेत्रात त्यांना ओळखले जाते. तर सतीष शिंगटे यांन्ीही नाट्य, एकाकीका क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. रात्री मतमोजणीनंतर मतदार कोणाला संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
नाट्य परिषद निवडणुकीच्या मतदानाची धुळवड सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 12:13 IST
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
नाट्य परिषद निवडणुकीच्या मतदानाची धुळवड सुरु
ठळक मुद्देनगर शहर व शेवगामध्ये सुविधा