शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दरीत कोसळून नाशिकच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 18:16 IST

विश्रामगड पट्टाकिल्ला परिसरातील कोकणवाडी शिवारातील पवनचक्की क्रमांक ५४ च्या जवळ कड्यावरुन खोल दरीत कोसळून नाशिक रोड येथील एका पर्यटक तरुणाचा मृत्यू झाला.अभिषेक विनोदकुमार उपाध्याय (वय २६) असे त्याचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : तालुक्यातील विश्रामगड पट्टाकिल्ला परिसरातील कोकणवाडी शिवारातील पवनचक्की क्रमांक ५४ च्या जवळ कड्यावरुन खोल दरीत कोसळून नाशिक रोड येथील एका पर्यटक तरुणाचा मृत्यू झाला.अभिषेक विनोदकुमार उपाध्याय (वय २६) असे त्याचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांना व ग्रामस्थांना रविवारी रात्री घटनेची माहिती कळताच त्यांनी स्थानिक गिर्यारोहक व सर्पमित्रांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले. मात्र धुक्यामुळे रात्री शोधले कामात अडथळा आला. सोमवारी सकाळी दरीतून संबंधीत तरुणाचा मृत्यदेह बाहरे काढण्यात आला. दुपारी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणला गेला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी अभिषेक विनोदकुमार उपाध्याय नाशिक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला युवक आपल्या तीन मित्रांसोबत घरी पिच्चरला जातो असे सांगून विश्रामगड परिसरात पर्यटनासाठी आला होता. रात्री साडे सात वाजण्याच्या दरम्यान कोकणवाडी शिवारातील पवनचक्की क्रमांक ५४ च्या बाजूला कोकणकड्यावर हे चार मित्र पोहोचले. तेथे काही वेळ थांबले. दरम्यान अभिषेक टाकेदच्या बाजूच्या दरीत कोसळला. सेल्फीच्या नादात त्याचा दरीत तोल गेला असावा असा प्राथमिक आंदाज व्यक्त होत असून त्याच्या सोबतच्या तरुणांना तो दरीत पडल्याची बाब लक्षात येताच त्यांनी स्थानिक गावकºयांच्या मदतीने शोध सुरु केला. पण खोल दरी, दाट जंगल,रात्रीचा अंधार, निशाचरांची भीती यामुळे शोध कार्यात अडथळा आला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आला. त्याच्याबरोबर आलेले दोन मुले महाविद्यालयात अभियांत्रीकीचे शिक्षण घेतात तर एक खासजी नोकरीत आहे. या तिघांनाकडे पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. विनोदकुमार पद्मदेव उपाध्याय, नाशिक रोड यांच्या खबरीवरुन अकोले पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अभिषेक हा एकुलता एक होता. त्याला तीन बहिणी असून कॅनडा येथे त्या असल्याचे समजते.