शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावरील पाखरांना नगरकरांचे बळ

By अरुण वाघमोडे | Updated: October 9, 2017 17:43 IST

अहमदनगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन रायगडावर ताक विकणारी दहा वर्षांची कमल शिंदे, तर छत्रपती शिवरायांचे विचार जगभरात पोहोचविण्याची ...

अहमदनगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन रायगडावर ताक विकणारी दहा वर्षांची कमल शिंदे, तर छत्रपती शिवरायांचे विचार जगभरात पोहोचविण्याची इच्छाशक्ती बाळगणा-या तेरा वर्षांच्या महेश औकिरकरच्या पंखांना बळ देण्याचा निर्णय नगरच्या निरंजन सेवाभावी संस्थेने घेतला आहे़ या दोन्ही मुलांचा सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येत आहे़हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर २० ते २५ कुटुंब छत्रपती शिवाजी महारांच्या कार्यकालापासून वास्तव्यास आहेत़ या कुटुंबीयांचे पूर्वज छत्रपतींच्या सैन्यात मावळे होते असे सांगितले जाते़ गडावर येणा-या पर्यटकांना खाण्यापिण्याच्या वस्तू विकून हे कुटुंब आपला उदारनिर्वाह करतात़ याच कुटुंबातील कमल शिंदे ही इयत्ता पाचवीत शिक्षण घेते़ तिचे आई-वडील गडावरच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ खेळण्याबागडण्याच्या वयात कमलवरही कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी आहे़ गडावर दररोज १०० रुपयांचे ताक विकल्यावरच कमल शाळेत जाते़ कमलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे़ यासाठी तिची कितीही कष्ट करण्याची तयारी आहे़गडावरच राहणारा दुसरा महेश औकिरकर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो़ छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रभावी भाषेत आणि खास शैलीत तो व्याख्यान देतो़ शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व भारत देशासह जगभरात पोहोचावे असे महेश याला वाटते़ या दोन चिमुकल्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या नगर शाखेच्या सदस्यांनी निर्णय घेतला आहे़ या दोन्ही मुलांना कायमस्वरूपी दत्तक घेतले असून, त्यांचा सर्व खर्च संस्थेच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे़ संस्थेचे सदस्य अतुल डागा, किरण मणियार, रविकांत काबरा, प्रसाद बेडेकर, स्वप्नील कुलकर्णी यांसह अनेक नगरकर या उपक्रमात सहभागी आहेत़

६० विद्यार्थ्यांचे पालकत्व

निरंजन सेवाभावी संस्थेने रायगड जिल्ह्यातील हिरकणीवाडी, महाड शाळेतील ६० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे़ या मुलांना शाळेचा गणवेश, बूट, दप्तर, वह्या-पुस्तके आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे़

अनेक गरीब कुटुंबातील मुले केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहेत़ समाजातील अशाच काही मुलांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल व्हावे याच उद्देशातून निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ‘शैक्षणिक पालकत्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुलांना आपल्या मदतीची गरज आहे़ समाजातील दानशूर व्यक्तींनी आमच्या या कामात हातभार लावावा़^-अतुल डागा, सदस्य निरंजन सेवाभावी संस्था