शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दर सोमवारी महिलांसाठी नगर-पुणे बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:07 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे खास महिलांसाठी दर सोमवारी नगर-पुणे बससेवा सुरू करण्यात आली आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे खास महिलांसाठी दर सोमवारी नगर-पुणे बससेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच बसला महिलांची उत्स्फूर्त गर्दी होती. महिला वाहकाच्या हस्ते नारळ वाढवून या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.नगर शहर व जिल्ह्यातील अनेक महिला, मुली, विद्यार्थिनी नोकरी, शिक्षणासाठी नगरहून पुणे येथे ये-जा करतात. दुसºया व चौथ्या शनिवारी, तसेच रविवारी सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या व बँकांना सुट्या असतात. त्यामुळे पुण्याहून नगरला येण्यासाठी दर शुक्रवारी पुणे बसस्थानकावर गर्दी असते. तसेच सोमवारी पुन्हा पुण्याकडे जाताना नगरमधील बसस्थानकात महिला बससाठी आटापिटा करताना दिसतात. ही संख्या अधिक असल्याने, तसेच महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी विभागीय नियंत्रक विजय गिते यांनी या मार्गावर खास महिलांसाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता या बसला महिला वाहक संध्या हळगावकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी दादाजी महाजन व तारकपूरचे आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी तब्बल ४३ महिला प्रवाशांनी ही बस गच्च भरली. या बससेवेमुळे महिलांच्या चेह-यावर समाधान दिसत होते. दर सोमवारी नगरहून, दुस-या व चौथ्या शुक्रवारी पुण्याहूनदर सोमवारी सकाळी ६ वाजता तारकपूर बसस्थानकातून ही खास बस सुटणार आहे. त्यानंतर महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुणे येथून नगरसाठी बस सुटणार आहे. या बससेवेसाठी मोबाईलद्वारे तिकीट बुकिंगही करता येणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिक