शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 16:56 IST

राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार मिळाला आहे.

अहमदनगर : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी तो दिल्लीत स्वीकारला.केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८मध्ये महाराष्ट्र राज्याने जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामागिरीची नोंद घेतली आहे. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे महाराष्ट्रातील सुमारे १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच या कामांमुळे अनेक गावांतील भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गेल्या वर्षात टँकरच्या संख्येतही घट झाली होती. राज्य शासनाच्या या कामाची दखल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये घेण्यात आली आहे. या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. यात विविध गटात राज्याला दहा पुरस्कार मिळाले. त्यात भूजल पुनरुज्जीवन विभागात नगरला प्रथम पुरस्कार मिळाला.पुरस्काराबद्दल जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. गेल्या चार वर्षात या योजनेमध्ये चांगले काम झाले. सचिव एकनाथ डवले म्हणाले की, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, नदी पुनरुज्जीवन या सारख्या योजनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत.लोणारे यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुकजलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले़ नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाविण्यापूर्ण उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगत लोणारे यांनी तयार केलेल्या जलयुक्त शिवार अभियान या पुस्तिकेचे विमोचनही फडणवीस यांनी मुंबई येथे केले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर