शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ रडीच्या डावाला माझे ‘सुवर्ण’ उत्तर - राहुल आवारे

By साहेबराव नरसाळे | Updated: May 7, 2018 13:46 IST

रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना राहुल आवारे नगरमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : ‘रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे. आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिंपिक होत आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना राहुल आवारे नगरमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. २०१६ साली झालेल्या रिओ आॅलिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत आवारे याने सर्व प्रतिस्पर्धी मल्लांवर मात करीत रिओ आॅलिंपिक स्पर्धेतील सहभागावर आपला हक्क सांगितला होता. मात्र, भारतीय कुस्ती महासंघाने राहुलला डावलून हरियाणाच्या संदीप तोमरची निवड केली होती. तसेच राहुलवर बंदी घालण्याची धमकीही दिली होती. त्यावरुन महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मोठे वादळ उठले होते. २०१६ च्या वादानंतर राहुल आवारे प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात उतरला होता. त्यामुळे राहुलच्या कुस्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रकुलमध्ये ५७ किलो वजनगटात राहुलने सुवर्णपदक पटकावले.आॅलिंपिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तेच स्वप्न घेऊन मी खेळत होतो. पण २०१६ साली माझ्यावर अन्याय झाला. त्यानंतर पुन्हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे माझ्यासाठी खूप अवघड होते. त्या अन्यायाला उत्तर देण्यासाठीच मी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने उतरलो होतो. त्यांना त्यांचे उत्तर मिळाले आहे. आता मागील विसरुन पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. आॅगस्ट २०१८ मध्ये एशियन गेम्स स्पर्धा होत आहेत. त्याची तयारी सुरु आहे. पुढील महिन्यात जॉर्जिया येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. त्यानंतर सोनीपत येथे कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे. २०२० मध्ये टोकियो येथे आॅलिंपिक स्पर्धा होत आहे. त्याचीही तयारी सुरु आहे, असे राहुल आवारे याने सांगितले.

टोकियो आॅलिंपिकची तयारी

टोकियो आॅलिंपिकसाठी पुढील वर्षी पात्रता स्पर्धा होणार आहे. त्यासाठीही परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणार आहे. परदेशात जाऊन कुस्तीचा सराव यासाठी करायचा आहे की, तेथे विविध देशातील आंतरराष्ट्रीय मल्ल येतात. त्यांच्याकडून आपल्याला कुस्तीतील नवेनवे डाव-प्रतिडाव शिकायला मिळतात. तसेच तेथे सुविधाही चांगल्या असतात, असे राहुल आवारे याने सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर