शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितला पालकमंत्र्यांचा अधिकार, मुश्रिफ यांचे अण्णांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:40 IST

पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचाच एक प्रतिनिधी असतो. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे कारण नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तत्काळ दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्रात पालकमंत्र्यांचे काय अधिकार असतात, हेच मुश्रिफ यांनी अण्णांना पटवून दिले आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या स्थितीमध्ये सर्वच शासकीय यंत्रणा काम करते आहे. अशा स्थितीत निवडणुका घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कायद्याचा आधार आणि विधी विभागाने दिलेला सल्ला यानुसारच ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची निवड करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिलेले आहेत. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचाच एक प्रतिनिधी असतो. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे कारण नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तत्काळ दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  या पत्रात पालकमंत्र्यांचे काय अधिकार असतात, हेच मुश्रिफ यांनी अण्णांना पटवून दिले आहे.

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश हा राजकीय हेतुने प्रेरीत असून यामुळे घोडेबाजार होईल. पालकमंत्र्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार हा घटनाबाह्य असल्याचे अण्णा हजारे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले होते. त्याला मंत्री मुश्रिफ यांनी तत्काळ उत्तर दिले आहे. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा शासनाचा प्रतिनिधी म्हणूनच कामकाज पाहत असतो. विविध समित्यांवरील सदस्य पालकमंत्रीच नियुक्त करतात. जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून पालकमंत्री कार्यरत असतो. जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचा तो अध्यक्ष असतो. जिल्ह्याच्या आपत्कालीन स्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये तो दुवा म्हणून काम करतो. पालकमंत्र्यांना माझ्या स्वत:च्या सहीने पत्र देऊन चांगल्या, कार्यक्षम व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. चुकीचे काही झाल्यास नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास खात्याला आले. याबाबत उच्च न्यायालयातही याचिका दाखल झालेल्या आहेत. याबाबत न्यायालयाचाही निर्णय स्वागतार्ह असेल, असे मुश्रिफ यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे