शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ औषधी वनस्पतींचे राहुरीमध्ये संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 04:23 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़

भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़ १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे संवर्धन व्हावे व शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ६६० वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे़राज्यात अभावाने आढळणाºया काही दुर्मिळ वनस्पती विद्यापीठाने जतन करून ठेवल्या आहेत़ विषारी प्राण्याने दंश केल्यास प्राथमिक उपचार म्हणून वापरली जाणारी अंकोळ औषधी वनस्पतीचे संवर्धन केले आहे़ अंकोळचा लेप लावला की ते विष ओढून घेते़ पांढºया डागावरही ही वनस्पती उपयुक्त आहे़ पोट विकारासाठी गोरख चिंच तर भद्राक्ष ही वनस्पती मुळव्याधीवर उपयुक्त आहे़जखमेवर अर्जुन साताडा, कॅन्सरवर लक्ष्मण फळ, पोटाच्या व्याधीसाठी ब्रम्हानंद उपलब्ध आहे़ भिकाºयाचे वाडगे अर्थात कलाबक्ष ही वनस्पतीही उपलब्ध आहे़ कलाबक्षाच्या फळात साठविलेले पाणी पिल्यास पोटाचे विकार बरे होतात़ पूर्वीच्याकाळी भिक्षेकरी व साधू लोक कलाबक्षाचा वापर पाण्याची भांडे म्हणून करत.औषधी प्रकल्पात दहा प्रकारच्या तुळशी आहेत़ ५० एकरावर साकारलेल्या प्रकल्पात नक्षत्र गार्डन आहे़ राशीनुसार वनस्पतींची लागवड केली जाते़ संजीवनी वाटीकामध्ये उंच व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे़ सुगंधी वनस्पतींपासून अर्क काढला जातो़ निलगिरीपासून काढलेला अर्क सर्दी, पडसे व डोके दुखी, सांधे दुखीसाठी थांबण्यासाठी उपयुक्त आहे़ जावा सेट्रोनीला या वनस्पतीपासून काढलेल्या अर्कचा उपयोग डास पळविण्यासाठी केला जातो़ याशिवाय फ्रेशनर म्हणूनही या अर्काचा होतो.सुगंधी व औषधी प्रकल्पामध्ये आवळा, शतावरी, मेहंदी, शिकेकाई आदींचे चुर्ण तयार केले जातात़ विद्यापीठाला भेटी देण्यासाठी आलेले शेतकरी औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाला अवर्जून भेटी देतात़ सोबत वनस्पती, बियाणे व बनविले अर्क सोबत घेऊन जातात़ विभाग प्रमुख म्हणून अशोक जाधव, इनचार्ज प्रसन्न सुराणा, सहाय्यक गणेश धोंडे, विक्रम जांभळे कार्यरत आहेत़>औषधी व सुगंधी प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध राज्यातून शेतकरी व परदेशी पाहुणेही येतात़ त्यांना वनस्पती जतन करण्याबरोबरच मार्गदर्शन केले जाते़ वर्षातून एकदा औषधी वनस्पतीसंदर्भात प्रशिक्षणही दिले जाते़ - गणेश धोंडे, औषधी वसुगंधी वनस्पती प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी