शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करुन मृतदेह पेट्रोल टाकून पेटविला; चारित्र्याच्या संशयातून घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:01 IST

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन एका रस्त्याच्या कडेला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली आहे. पोलिसांनी पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राहाता : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन एका रस्त्याच्या कडेला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली आहे. पोलिसांनी पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मयत महिलेचा भाऊ सुनील आप्पासाहेब तरस (वय ३३, रा.खैरी निमगाव, ता.श्रीरामपूर) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे. माझी बहीण छाया सुनील लेंडे (वय ३२, रा एकरुखे) हिचा २००८ साली एकरुखे येथील सुनील जनार्धन लेंडे याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोन वर्षांनी तिचा पती सुनील व तिच्यात चारित्र्याच्या संशयावरुन नेहमी वाद सुरु होते. त्यांना तीन मुले आहेत. शनिवारी (दि.२२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४ वाजता सुनील हा छाया हिला घेऊन शेतात घास कापण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. छाया हिने घास कापण्यास सुरुवात केल्यानंतर पाठीमागून सुनीलने तिच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोराचा फटका मारुन तिचा खून केला. यानंतर तो छाया हिचा मृतदेह तेथेच शेतात ठेऊन तो घरी आला. त्याने आपल्या आई, वडिलांना  सांगितले की, रुई गावचा पाहुणा मयत झाल्याने तुम्ही मुलांना घेऊन रुईला जा. मी पाठीमागून येतो. असे सांगून घरच्यांना त्याने गावी पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो शेतात पोते व पेट्रोल घेऊन गेला. छाया हिचा मृतदेह पोत्यात भरुन आपल्या मालकीच्या शेतापासून एक किलोमिटर दूर अंतरावरील नपावाडी रोडवर घेऊन गेला. तेथे पोत्यातील मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेऊन त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर घटनेनंतर आरोपी सुनील लेंडे हा राहाता पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. पोलिसांना त्याने घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तातडीने त्याला घेऊन घटनास्थळी आले. यावेळी त्याची पत्नी छाया हिचा मृतदेह जळत होता. पोलिसांनी इतरांच्या मदतीने आग विझविली. मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठवून दिला. यानंतर आरोपीविरुध्द राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला