शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रांजणीत बांधकाम मजुराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:55 IST

घराचे बांधकाम करणा-या खोसपुरी येथील एका मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील रांजणी येथे मंगळवारी दुपारी घडली.

पाथर्डी : घराचे बांधकाम करणा-या खोसपुरी येथील एका मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील रांजणी येथे मंगळवारी दुपारी घडली.साहिल पठाण (रा.खोसपुरी, ता. नगर) असे या खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की,  मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा ठेका घेतलेला होता. या कामावर दहा दिवसापासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) हे मजुरीने बांधकाम करीत होते. मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली असता दुपारी १ वाजता वाळू चालत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपी आले. त्यांनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात, असे सांगितले. त्यामुळे घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले. तरीही त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेले. आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कु-हाडीने  घाव घातला. यात साहिल जखमी झाला. त्यास तत्काळ पाथर्डी व नंतर नगर येथे खासगी दवाखान्यात हलवले. परंतु गंभीर दुखापत गंभीर असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Pathardiपाथर्डीCrime Newsगुन्हेगारी