शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

लोणी मावळा खून प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड द्या; उज्ज्वल निकम यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:04 IST

लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. या खटल्याचा १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले.

अहमदनगर : लोणी मावळा (ता. पारनेर) येथे तिघा आरोपींनी कट रचून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला़ त्यानंतर तिचा अतिशयनिर्घृणपणे खून केला़ अशा पद्धतीने अत्याचार आणि खून अपवादात्मक घटना आहे. सरकारी पक्षाने समोर आणलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केली.लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. या खटल्याचा १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले.न्यायालयाने मंगळवारी आरोपींना समोर बोलावून शिक्षेबाबत त्यांचे म्हणणे विचारले़ सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. निकम म्हणाले, लोणी मावळा येथे २२ आॅगस्ट २०१४ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाची घटना घडली. या घटनेच्या आधी मात्र आरोपी क्रमांक एक संतोष लोणकर याने सदर मुलीची छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २२ आॅगस्टला संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग केला. मुलीस पकडून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिच्या नाका-तोंडात चिखल घातला़ संतोष लोणकर याने मुलीच्या डोक्यावर स्कू्रड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकर याने तिच्या डोक्यात दगड घातला, तर दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. तसेच मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या सर्व अंगावर जखमा आढळून आल्या होत्या. आरोपींनी अतिशय विकृत पद्धतीने हे कृत्य केले. या घटनेतील सर्व आरोपी हे समजदार आहेत़ केलेल्या कृत्याचे परिणाम त्यांना माहीत होते. तरीही त्यांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अ‍ॅड़ निकम यांनी केली. खटल्याचा मंगळवारीच निकाल लागेल या अपेक्षेने न्यायालयात पीडित मुलीचे आई-वडील, इतर नातेवाईक व मैत्रिणी व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोपींचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते.

माझी नार्को करा

न्यायालयाने आरोपींना शिक्षेबाबत म्हणणे मांडण्याची संधी दिली, तेव्हा आरोपी क्रमांक दोन मंगेश लोणकर याने मी निर्दोष आहे. माझी नार्को चाचणी करा, अशी मागणी केली. तसेच आरोपी संतोष लोणकर म्हणाला, मला तीन मुली आहेत. याचा विचार व्हावा. आरोपी दत्तात्रय शिंदे म्हणाला, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. घटनेआधी मी आठ दिवस लोणी मावळा येथे कामासाठी आलो होता.

आरोपी पक्षाकडून युक्तिवाद

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अनिल अरोटे व परिमल फळे यांनी युक्तिवाद केला. आरोपी हे सराईत गुन्हेगार नाहीत. तसेच त्यांच्या पाठीमागे कुटुंब आहे. याचा विचार करून त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. निकम यांनी आक्षेप घेत आरोपींचा इतिहास गुन्हेगारीचा नसला, तरी ते पुन्हा गुन्हा करणार नाहीत, हे कशावरून. तसेच दुर्जनांना सज्जन करण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तर ते कधीच सज्जन होत नाहीत, असा युक्तिवाद केला.

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचा संदर्भ

अ‍ॅड. निकम यांनी शिक्षेवर युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयातील बच्चनसिंग विरोधात पंजाब सरकार यासह तीन खटल्यांचा संदर्भ देत आरोपींना फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे नमूद केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय