शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका हद्दीत अतिक्रमण करणारा पालिका लिपिक निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:53 IST

शहरातील शेवगाव रोडवरील अर्जुनबाबा मंदिरालगत असलेल्या शासकीय जागेवर पालिकेच्याच कर्मचा-याने अतिक्रमण करून अतिक्रमण काढायला गेलेल्या

पाथर्डी : शहरातील शेवगाव रोडवरील अर्जुनबाबा मंदिरालगत असलेल्या शासकीय जागेवर पालिकेच्याच कर्मचा-याने अतिक्रमण करून अतिक्रमण काढायला गेलेल्या अतिक्रमण विरोधी विरोधी पथकाला धमकावून सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणीपालिका लिपिक शौकत इब्राइम सय्यद यास मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी निलंबित केले आहे.शहरातील शेवगाव रोड लगत जुन्या साकेगाव रस्त्याची जागा खुली असून त्याबाबत न्यायालयात वाद प्रलंबित आहे. याच बाबीचा गैरफायदा घेत नगर पालिका कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले शौकत इब्राइम सय्यद यांनी अर्जुनबाबा मंदिरा लगतच्या सुमारे दोन गुंठे खुल्या जागेवर पालिकेच्या परवानगी नसताना पत्र्याचे शेड उभारले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी सय्यद यांच्या बेकायदा बांधकामा बाबत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला तक्रारी केल्या होत्या. त्याच अनुषंगाने ६ डिसेंबर रोजी अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख सोमनाथ गर्जे तसेच अभियंता संजय गिरमे, कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद, बांधकाम विभाग प्रमुख किशोर पारखे, पाणीपुरवठा अभियंता कुणाल पाटील, अशोक डोमकावळे, अंबादास साठे, कुरेश पठाण, शिवाजी पवार असे कर्मचारी अतिक्रमन काढण्यासाठी जागेवर गेले असता शौकत सय्यद यांनी पथकातील अतिक्रमण हटवण्यास विरोध करत जागा माज्या पत्नीच्या नावे असून अतिक्रमण काढल्यास तुमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात पत्नीला फिर्याद दाखल करायला लावीन अशा धमक्या देत अतिक्रमण हटवण्यास विरोध केला. याबाबत अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सोमनाथ गर्जे व इतर कर्मचा?्याचे लेखी म्हणणे व सविस्तर अहवाल मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना सादर केला असता पालिका लिपिक शौकत इब्राइम सय्यद यास महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८१ व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील तरतुदी नुसार ७ डिसेंबरच्या मध्यांनानंतर पुढील आदेशा पर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी