शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

नगर मनपा निवडणूक : हमीपत्र मिळाले नाही तर व्हावे लागणार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:49 IST

हद्दपारीच्या प्रस्तावात अटी आणि शर्तीवर शहरात राहण्याची परवानगी मिळालेल्यांना राजपत्रित अधिकाऱ्याचे हमीपत्र पोलिसांना सादर करावे लागणार आहे.

अहमदनगर: हद्दपारीच्या प्रस्तावात अटी आणि शर्तीवर शहरात राहण्याची परवानगी मिळालेल्यांना राजपत्रित अधिकाऱ्याचे हमीपत्र पोलिसांना सादर करावे लागणार आहे. असे हमीपत्र सादर केले नाही तर पोलीस त्यांनाही शहरातून हद्दपार करणार आहेत. त्यामुळे उपद्रवींवर हद्दपारीची टांगती तलवार कायम आहे. महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ६६४ उपद्रवी लोकांचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर केले होते.  आतापर्यंत यातील ४११ जणांना हद्दपार करण्यात आले आहे़ तिघांची नावे वगळण्यात आली आहेत तर दोघांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.उर्वरित १७१ जणांना अटी व शर्तीवर महानगरपालिका निवडणूक काळात शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना राजपत्रित अधिका-याचे हमीपत्र पोलिसांना आदेश झाल्यापासून २४ तासाच्या आत सादर करावे लागणार आहे. एका राजपत्रित अधिका-याला एकाच व्यक्तीला हमीपत्र देता येणार आहे. त्यामुळे अटी आणि शर्तीवर शहरात राहणा-या १७१ जणांना राजपत्रित अधिका-याचे हमीपत्र मिळणे अवघड आहे. असे हमीपत्र मिळाले नाही तर पोलीस त्यांना शहरातून हद्दपार करणार आहेत.तडीपारांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथकमहापालिका निवडणूक काळात शहरातून तडीपार करण्यात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. जे तडीपार झाले आहेत त्यांच्यावर हे पथक नजर ठेवणार आहे. दिलेल्या मुदतीत हद्दपार झालेले शहरात आढळून आले तर त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार आहे. केडगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनातकेडगाव येथे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत दोघा शिवसैनिकांची हत्या झाल्याने पोलिसांनी दक्षता म्हणून यावेळी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे. तसेच रात्रीची गस्तही वाढविली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणा-यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस कर्मचा-यांना देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाahmednagar policeअहमदनगर पोलीस