अहमदनगर : महापालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. महापौर रोहिणी शेंडगे यांनी बडे सभागृहनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र प्रदान केले. ते सभागृहनेता पदाचा अधिकृत पदभार बुधवारी स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, दत्ता सप्रे, अमोल येवले, मदन आढाव, आकाश कातोरे, भालचंद्र भाकरे आदी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर सभागृहनेते अशोक बडे म्हणाले, सभागृह नेतेपदाच्या माध्यमातून सावेडी उपनगरातील विकासकामांना गती दिली जाईल. महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांच्या सहकार्याने शहर विकासाचे नियोजन करणार असल्याचे बडे यांनी सांगितले. महापौर शेंडगे यांनी बडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, सभागृहात विविध विषयांवर चर्चा होऊन प्रश्न सुटतात. त्यासाठी सभागृह नेत्यांची भूमिका महत्त्वाची असते, असे शेंडगे म्हणाल्या.
.....
सूचना: फोटो १३ अशोक बडे नावाने आहे.