शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पी.एफ.साठी नगर कारखाना लिलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:13 IST

नगर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या नगर तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर आता तो भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढण्यात आला आहे.

मिलिंदकुमार साळवे अहमदनगर : नगर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या नगर तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर आता तो भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढण्यात आला आहे.एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीचे आगार असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात नगर तालुक्यात एकही साखर कारखाना अस्तित्वात नव्हता. ही बाब लक्षात घेऊन माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर कारखाना सुरू केला. सुरूवातीस काही काळ हा कारखाना चालविल्यानंतर आर्थिक दुष्टचक्रात हा कारखाना अडकला. त्यातून कारखान्यास बाहेर काढण्यासाठी तो खाजगी तत्वावरदेखील चालविण्यास देण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला. पण हा प्रयोगही फसला. नंतर हा कारखाना बंदच पडला.सन २०१०-११ च्या सुमारास या कारखान्याचा शेवटचा गळीत हंगाम पार पडला. त्यानंतर घरघर लागलेला हा कारखाना कायमचा आजारी पडला. कारखाना बंद पडल्याने त्याच्या देणेकऱ्यांची संख्या वाढली. महाराष्टÑ राज्य सहकारी बँकेकडून या कारखान्याने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने कारखान्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली. त्यानुसार कारखान्याची काही मालमत्ता विक्रीस काढण्यात आली. कारखाना आर्थिक अडचणीत सापडून दिवाळखोरीत गेल्यानंतर त्याचे अर्थचक्र जागेवरच थांबले. त्यातूनच कारखान्यास कर्मचाºयांचा भविष्य निर्वाह निधी भरणेही अवघड झाले. भविष्य निर्वाह निधी वेळेवर भरण्यात न आल्यामुळे नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्यास नोटिसा देऊन कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर कारखान्याने कर्मचाºयांच्या थकलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कार्यालयाकडे भरली. पण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने अगोदरच्या थकीत रकमेवर व्याज व दंड आकारणी केली.या दंड व व्याजाच्या रकमेपोटी कारखान्याकडे १ कोटी ३४ लाख रूपयांची थकबाकी असल्याचे सांगून ही रक्कम भरण्याची मागणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याकडे केली. पण दिवाळखोरीत गेलेल्या या कारखान्यास ही रक्कम भरता आलेली नाही. त्यामुळे आता ही रक्कम वसूल करण्यासाठी कारखाना लिलावात काढण्यात आला आहे.१५ नोव्हेंबरला आॅनलाइन लिलाववाळकी (ता. नगर) येथील नगर तालुका सहकारी साखर कारखाना सहकार खात्याने अवसायानात काढला आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने १ कोटी ३४ लाख रूपयांच्या वसुलीसाठी येत्या १५ नोव्हेंबरला आॅनलाइन लिलाव पुकारला आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय