शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : पहिल्या दिवशी ३२४ अर्जांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:14 IST

अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ३२४ जणांनी अर्ज विकत घेतले. १७ जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल ...

अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ३२४ जणांनी अर्ज विकत घेतले. १७ जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. जुन्या शहरातून अर्ज घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज प्रत्यक्षही निवडणूक निर्णय अधिका-यांकडे सादर करावा लागणार आहे. पहिल्या दिवशी एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल करून श्रीगणेशा केला.महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी पहिला दिवस होता. सकाळपासूनच अर्ज विकत घेण्यासाठी इच्छुकांच्या समर्थकांची गर्दी होती. अर्ज घेणा-यांमध्ये शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, त्यांचे नातेवाईक आघाडीवर होते. अर्जासह पुस्तिकाही सोबत दिली जात आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाहून अर्ज डाऊनलोड करून तो आॅनलाईन भरायचा आहे. पहिल्या दिवशी १७ जणांनी आॅनलाईन अर्ज (कंसात प्रभाग क्रमांक) दाखल केले आहेत. शीतल मनोज भूजबळ (१३), मनोहर गजानन जाधव (१), शरद विष्णू शिंदे (१४), अरकान हाफीज जहागीरदार शेख (३), इरफान वाजिद शेख (१०), निहाल अहमद रफीक शेख (१०), अंजली संतोष देवराव (१३) सोहेब जलाल शेख (३), सलमान वाजीद शेख (१), अनिल जॉन भिंगारदिवे (६),भूषणकुमार रामपा मडकरी (१), दीपक नारायण दांगट (९), गोरख प्रल्हाद कंडाळकर (४), प्रमोद अर्जुन लगड ( २) अशी आॅनलाईन अर्ज दाखल केलेल्यांची नावे आहेत.एकाच्या अर्जावर नावाऐवजी ‘जीजीजी’एवढेच नाव असून तो प्रभाग क्रमांक पंधरासाठी दाखल झाला आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांच्यासह विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.प्रभाग क्रमांक १३ (क) या सर्वसाधारण महिला या जागेसाठी शीतल मनोज भूजबळ यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्षही अर्ज दाखल केला आहे. बुरुडगाव विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भूजबळ यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे़श्रीपाद छिंदमही मैदानातछत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम यानेही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्याने प्रभाग क्रमांक ९ आणि १३ मधून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज घेतला आहे. छिंदम याला कोणत्याही पक्षाकडून तिकिट मिळण्याची शक्यता नसल्याने तो दोन्ही प्रभागातून अपक्ष निवडणूक लढविणार आहे. एका प्रभागातून तो स्वत: व दुसºया प्रभागातून त्याची पत्नी निवडणूक लढविणार आहे.अर्ज विक्री संख्यामाळीवाडा विभाग-१५०सावेडी विभाग-७०बुरुडगाव विभाग-३२केडगाव विभाग-७२एकूण- ३२४

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर