शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : सोशल मीडियावर प्रचाराचा जोर-शोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:06 IST

शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, सोशल मीडियावरही प्रचाराचा चांगलाच ज्वर चढला आहे़

अहमदनगर : शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, सोशल मीडियावरही प्रचाराचा चांगलाच ज्वर चढला आहे़ सर्वच पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो, प्रभाग क्रमांक आणि पक्षाचे चिन्ह फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर झळकत आहेत.आपले मत म्हणजे विकासाला मत, आता गुलाल आम्हीच उधळणार, किंंग ईज बॅक, आवाज कुणाचा, सर्वांगीण विकास हवा असेल तर मत दादा-भाऊलाच अशा आशयांच्या घोषवाक्यांच्या माध्यमातून उमेदवार सोशल मीडियावर प्रचार करत आहेत़ उमेदवाराच्या फोटोसह आकर्षक जाहिरात तयार करून प्रभागाचा आम्हीच कसा विकास करणार याचे विश्लेषणही सोशल मीडियावर दिले जात आहे़ आॅडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिपचाही सध्या सर्वत्र आवाज घुमत आहे़ सध्या सर्वांच्याच हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल दिसतात़ होम टू होम आणि रस्त्यावरील प्रचारासह सोशल मीडियावरील प्रचारातून उमेदवारांना मतदारांपर्यंत सहज पोहोचता येते़ त्यामुळे सर्वच उमेदवारांनी सोशल प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे़ आपलाच उमेदवार जनतेचे कसे भले करणार हे सांगणाऱ्या पोस्ट सध्या जोरदारपणे व्हायरल होत आहेत़ या पोस्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या विरोधी उमेदवारांवरही टीकास्त्र सोडले जात आहेत़ ९ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी आणखीणच रंगणार आहे.शहर विकासाचे कैवारीमहापालिकेची निवडणूक जाहीर होताच अनेकांना शहरातील प्रलंबित प्रश्नांची जाणीव झाली आहे़ हे प्रश्न आपणच कसे मार्गी लावू शकतो याचे दावे-प्रतिदावे सध्या सोशल मीडियावरून सुरू आहेत़ अनेक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारांचे ग्रुप तयार केले आहेत़ या गु्रपवर दिवसभर उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट टाकल्या जात आहेत.पब्लिसिटी एजन्सी कार्यरतबहुतांशी उमेदवारांनी प्रचार आणि इतर नियोजनाची जबाबदारी पब्लिसिटी एजन्सीला दिली आहे़ यामध्ये सोशल मीडिया, एसएमएस, एलईडी डिस्प्ले व्हॅन, उमेदवारांचा माहितीपट आदी हायटेक प्रचाराच्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका