शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका स्थायी समिती : राष्ट्रवादीकडून मनोज कोतकर, शिवसेनेकडून योगिराज गाडे यांचा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 14:38 IST

अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, तर शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. सभापतीपदासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी सकाळी मतदान घेण्यात येणार आहे. 

अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, तर शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. सभापतीपदासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी सकाळी मतदान घेण्यात येणार आहे. 

 कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. कोतकर हे सभापतीपदासाठी भाजपकडून  निवडणूक लढणार होते. मात्र महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी ऐनवेळी राजकीय खेळी खेळत कोतकर यांना राष्ट्रवादीत घेऊन महापौर बाबासाहेब वाकळे यांना मोठा धक्का दिला आहे. महापालिकेत महापालिकेत भाजपची सत्ता आहे.

भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापौर आहेत. महापौर वाकळे हे स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे घेण्यासाठी आग्रही होते. गेल्या तीन महिन्यांपासून कोतकर व वाकळे हे दोघे मिळून स्थायी समिती सभापती पदाची रणनीती आखत होते. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्याबाबत त्यांनी राज्य पातळीवरही पाठपुरावा केला होता. परंतु ऐनवेळी कोतकर यांनीच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.---भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे म्हणतात, नो कमेंट....

भाजपचे निष्ठावंत म्हणतात.... शहरातील भाजप ही राष्ट्रवादीच चालवत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा