शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:41 IST

अहमदनगर : २०१८ मध्ये होणाºया महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र मिळाले आहे. त्यानुसार शहरातील मतदार याद्या ३ आॅक्टोबरपासून अद्ययावत करण्याबाबत प्रशासनाने तयारी केली असून शहरात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी दोनशे बीएलओ (ब्लॉक लेवल आॅफिसर) नियुक्त केले आहेत.

अहमदनगर : २०१८ मध्ये होणाºया महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र मिळाले आहे. त्यानुसार शहरातील मतदार याद्या ३ आॅक्टोबरपासून अद्ययावत करण्याबाबत प्रशासनाने तयारी केली असून शहरात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी दोनशे बीएलओ (ब्लॉक लेवल आॅफिसर) नियुक्त केले आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांनी मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २०१८ मध्ये होणाºया महापालिका, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यानुसार शहरात महापालिकेची निवडणूक २०१८ मध्ये होणार आहे. नगर महापालिकेसोबत राज्यातील सांगली- मिरज-कुपवाडा, जळगाव, धुळे महापालिकेची निवडणूक २०१८ मध्ये होत आहे. नगर महापालिकेची पंचवार्षिक मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. म्हणजे त्यापूर्वी दोन महिने आधी म्हणजे पुढील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यासाठी १ जानेवारी २०१८ रोजीची अंतिम मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे, वगळणे याबाबतचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने २०० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांची आढावा बैठकही महापालिकेत झाली. आयुक्त घनश्याम मंगळे आणि प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी नगर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.-----------एका प्रभागात चार नगरसेवकसध्या एका प्रभागात दोन नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. सध्या ३४ प्रभाग आहेत. ते निम्मे होतील. आधी मतदार यादी अद्ययावत होईल. त्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वार्डरचना तयार करण्यात येईल. सध्या एका प्रभागात सात ते आठ हजार मतदार आहे. ती संख्या दुप्पट म्हणजे १८ ते २० हजार एवढी होईल. निवडणूक लढविणाºया उमेदवारांची संख्याही वाढणार आहे.------------जनतेमधून महापौरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे झालेल्या महापौर परिषदेत ‘ड’ वर्ग महापालिकांमधील महापौर जनतेमधून थेट निवडण्याची घोषणा केली. नगर महापालिका ‘ड’ वर्गातील आहे. नवखे उमेदवार आधी महापौरपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. चार ते पाचवेळा निवडून आलेले नगरसेवक महापौरपदाचे दावेदार असतील. ही निवडणूक नगरच्या आमदारकीची रंगीत तालीम ठरणार आहे.