शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, नांदेड, नगरला आज दिवस-रात्र समससमान-हवामानतज्ज्ञ प्रा. बी.एन.शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 11:33 IST

प्रकाशाच्या वक्रिभवनाने विषुवदिनाऐवजी दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी नगरसह पृथ्वीवरील १९ अंश उत्तर अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणी दिवस व रात्र समसमान भासणार आहेत, अशी माहिती हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी दिली. 

अहमदनगर : प्रकाशाच्या वक्रिभवनाने विषुवदिनाऐवजी दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी नगरसह पृथ्वीवरील १९ अंश उत्तर अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणी दिवस व रात्र समसमान भासणार आहेत, अशी माहिती हवामानतज्ज्ञ बी. एन. शिंदे यांनी दिली. २१ जूनला कर्कवृत्त व २२ डिसेंबरला मकरवृत्तावर गेलेला सूर्य २३ सप्टेंबर व २२ मार्चला विषुववृत्तावर येत असल्याने त्याला विषुवदिन म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या त्याच दोन दिवशी सर्व पृथ्वीवर दिवस व रात्र १२-१२ तासांचे समान असतात. पृथ्वीभोवती सुमारे बाराशे किलो जाडीचे वातावरण असून अवकाशातल्या पोकळीपेक्षा त्याची घनता जास्त असते. पृथ्वीकडे येताना ती वाढत जाते. प्रकाशकिरण विरळ माध्यमातून घन माध्यमात येताना वक्रिभूत होऊन स्तंभिकेकडे वळतात. याच कारणाने पाण्यात निम्मी बुडवलेली काठी पाण्याखाली तिरकी दिसते. अगदी याच नियमाने सूर्योदयाच्या थोडावेळ आधी अवकाशातून सरळ येणारे सूर्यकिरणे क्षितीजावरच्या वातावरणाच्या थरात घन माध्यमात प्रवेश करतात. पृथ्वीकडे वातावरणाची घनता वाढत असल्याने ते जास्त वक्रिभूत होऊन सूर्य लवकर उगवल्याचा भास होतो.  तसेच सूर्यास्तानंतरही काही वेळ वातावरणाने किरण वक्रिभूत होऊन पृथ्वीकडे येत असल्याने काही वेळ सूर्य असल्याचा भास होतो. म्हणूनच पृथ्वीवर विषुवदिनी दिवस व रात्र समान न भासता त्या दिवशी विषुववृत्तावर दिवस पाच मिनिटांनी मोठा भासतो. मुंबई, अहमदनगर, नांदेड ही शहरे १९ अंश अक्षांशावर असल्याने येथे तो १० मिनिटांनी मोठा भासतो. धु्रवांकडे हा कालावधी वाढत जातो.२७ व २८ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तापासून एक अंशाने किंवा ११३ किलोमीटर दक्षिण गोलार्धात गेलेला असल्याने तांत्रिकदृष्ट्या मुंबई, नगर व नांदेडला रात्र १० मिनिटांनी मोठी व्हायला पाहिजे. पण याच वक्रिभवनाच्या नियमाने सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतरही पाच-पाच मिनिटे सूर्यकिरणे येथे मिळत असल्याने नगरसह पृथ्वीवरील १९ अंश उत्तर अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणी दिवस व रात्र समसमान म्हणजे १२-१२ तासांचे भासणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर