शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांनी महावितरण अधिकाºयांना फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:37 IST

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने अधिकाºयांसह सगळेच घामाघूम झाले होते. भारनियमन रद्द करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना पुरेशा प्रमाणात कोळशाची उपलब्धता होत नसल्याने संपूर्ण राज्यात व नगर जिल्ह्यात तातडीचे भारनियमन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याची दररोज अंमलबजावणी होत आहे. सुरूवातीला ई, एफ, जी या गटात होणारे भारनियमन मंगळवारी डी व सी गटांतील फिडरवरही काही प्रमाणात झाले. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सध्या प्रचंड उकाडा असल्याने विजेशिवाय लोक घरात बसू शकत नाहीत. त्यामुळे तातडीने भारनियमन रद्द करण्याची मागणी करत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे आदींसह १०० ते २०० कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला. महावितरणने वसुलीनुसार शहराची ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अशी विभागणी केली आहे. नगर शहरात मोठ्या प्रमाणावर वीज थकबाकी आहे. तसेच चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. अपेक्षित बिल वसुली होत नसल्याने तसेच गळती वाढल्याने अनेक फिडर ई, एफ, जी या गटात गेले आहेत. त्यामुळे तेथे तातडीचे भारनियमन करण्यात आले आहे, असे अधीक्षक अभियंता बोरसे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक आणखीच भडकले. जे ग्राहक वीजबिल भरत नाहीत, ज्यांच्यामुळे थकबाकी वाढली अशांवर महावितरणने कारवाई करावी, त्याचा भुर्दंडसंपूर्ण शहराने का सोसायचा. जो बिल भरतो, त्याला वीज मिळालीच पाहिजे, जोपर्यंत भारनियमन रद्द होण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत अधीक्षक अभियंत्यांसह इतर अभियंत्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कार्यालयातील दिवे बंद करून कार्यकर्त्यानी ठिय्या दिला. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते.आंदोलकांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. उद्यापासून वसुलीत सुधारणा करू. तसेच १४ सप्टेंबरपासून भारनियमन बंद करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. -----------फोटो-साजीदलिस्टतातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.