शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam Postponed : परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वासघातकी : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 20:08 IST

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा

शिर्डी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

विखे म्हणाले, कोरोनाच्या कारणाने यापुर्वी सलग पाचवेळा परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता. आता झालेल्या निर्णयाप्रमाणे १४ मार्च रोजी या परीक्षा होतील, या आशेने विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत होते.  परंतू सरकारने अचानक परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय करून विद्यार्थ्यासमोर अडचण निर्माण केली. परीक्षेच्या तयारीकरीता बहुतांशी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जावून राहात आहेत. यासाठी त्यांना खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सलग पाचवेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आता हवालदिल झाले आहेत. त्यातच या परीक्षेसाठी वयाची अट असल्याने परीक्षा जेवढ्या लांबणीवर गेल्यास वयोमर्यादेच्या अटीमुळे विद्यार्थांना भविष्यात या परीक्षेस बसणेही  अडचणीचे ठरेल. याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे होते. परंतू या सरकारकडे तशी संवेदनशीलता नसल्याने  विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात घालण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. केंद्र सरकारने कोरोनाची सर्व नियमावली  पाळून युपीएसीच्या परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या. आरोग्य विभागाची परीक्षा राज्य सरकारने घेतली, तेव्हा कोरोना नव्हता का. सरकार फक्त आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा  सरकारने फेरविचार न केल्यास केल्यास राज्यात विद्यार्थाचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMPSC examएमपीएससी परीक्षा