शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासदार गांधी यांच्या बंगल्यासमोर राळेगणसिद्धी ग्रामस्थांचे आंदोलन; भजन म्हणून केला सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 18:46 IST

हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. गांधी यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये आंदोलकांनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. गांधी यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये आंदोलकांनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला.अण्णांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप सरकारने अण्णांचे उपोषण सोडविण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत सरकारचा तीव्र निषेध करुन गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ गांधी यांच्या बंगल्यासमोर आले. तेथे ग्रामस्थांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारातच भजन म्हणण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री व पंतप्रधानांना आज संध्याकाळपर्यंत ग्रामस्थांच्या भावना पोहोचविल्या जातील, अण्णांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करायला भाग पाडू, असे आश्वासन खासदार दिलीप गांधी यांनी राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेDilip Gandhiखा. दिलीप गांधीGovernmentसरकार