शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीत स्थानिकांना डावलल्याने आंदोलन : बीव्हीजीच्या कार्यालयास टाळे ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:02 IST

साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती करताना स्थानिकांना डावलले गेल्याने संतप्त झालेल्या शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले. यापुढे भरती करताना स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

शिर्डी : साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती करताना स्थानिकांना डावलले गेल्याने संतप्त झालेल्या शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले. यापुढे भरती करताना स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात नर्स भरती करताना शिडीर्तील बेरोजगार पात्र असणा-यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता़ मात्र सदर भरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी बाहेरच्या व्यक्तींना प्राधान्य दिल्याने संतप्त झालेले शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवक दत्तु कोते, नितिन कोते, रविद्र गोंदकर, नितिन शेजवळ, बबलु कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बीव्हीजीच्या कार्यालयात जाऊन उपस्थित सबंधित अधिका-यांना जाब विचारला. यावेळी या अधिका-याने अरेरावी केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर कार्यालयातील सर्वांना बाहेर काढुन टाळे ठोकण्यात आले.यावेळी आंदोलकांनी सांगितले की, संस्थानने संस्थानच्या रुग्णालयात नर्स भरती करण्याचे टेंडर बीव्हीजी कंपनीला दिले होते. या कंपनीने कर्मचारी भरती करताना नाशिक येथील खाजगी डाँक्टरां मार्फत मुलाखत घेऊन भरती प्रक्रिया राबविली. मात्र या भरतीत शिर्डीतील गरजवंतांनी केलेल्या अर्जाचा विचार न करता त्यांना डावलण्यात आले. अन्य ठिकाणच्या लोकांची भरती करण्यात आली. यापुर्वी या कंपनीने कर्मचारी भरती करताना शिडीर्तील तरुणांना प्राधान्य देण्याऐवजी बाहेर गावच्या तरुणांची भरती करुन घेतली. यापुढे साईबाबा संस्थानमध्ये कर्मचारी भरती करताना प्रथम प्राधान्य शिडीर्तील तरुणांना त्यानंतर शिर्डी मतदार संघातील तरुणांना नंतर बाहेर गावच्या तरुणांना संधी दयावी या प्रमाणे भरती न केल्यास भरती प्रक्रियास विरोध करुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा कोते, गोंदकर, शेजवळ यांनी दिला़ यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, तरुण,तरुणी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी