शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेण्याच्या हालचाली; आदिवासी आमदार राज्यपालांना भेटणार- मधुकर पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 11:08 IST

नागपूर अधिवेशनात धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विरोधात आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देत आदिवासींच्या हिताच्या मागण्यांसाठी येत्या दोन दिवसांत राज्यपालांची भेट घेऊन सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने निवेदन देणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिली.

अकोले : नागपूर अधिवेशनात धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विरोधात आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देत आदिवासींच्या हिताच्या मागण्यांसाठी येत्या दोन दिवसांत राज्यपालांची भेट घेऊन सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने निवेदन देणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिली.धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात सामावून घेऊ नका, शेतकरी कर्जमाफीसाठी आदिवासींच्या बजेटमधून ५०० कोटी रुपये व आदिवासी उपयोजनेचा ३० टक्के निधी कपातीचा निर्णय मागे घ्या, रक्ताच्या नात्यातून जातवैधता हा निर्णय आदिवासींमधील घुसखोरीला बळ देणारा असून, त्यास ख-या आदिवासींचा विरोध आहे. ‘टाटा’ने खरे खोटे आदिवासी ठरविण्यापेक्षा आदिवासी संशोधन समितीकडून आदिवासींचे सर्वेक्षण होऊ द्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन राज्य सरकारने विशेष मोहीम राबवून बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे नोक-या मिळविलेल्यांचा शोध घ्यावा, पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सरकारने करावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी मुंबईत २२ आमदारांची बैठक होत आहे. त्यानंतर बुधवारी सर्व संघटनांच्या वतीने राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे नेते यशवंत आभाळे, आदिवासी नेते मंगलदास भवारी, माधव गभाले, पी. ए. हिले, जि.प.सदस्य रमेश देशमुख आदी पत्रपरिषदेस उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना आदिवासींसाठी वेळ नाही

मुख्यमंत्र्यांना आदिवासींच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. त्यांची पाच वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण भेट झाली नाही. मुख्यमंत्री असंवेदनशील आहेत. आता त्यांना आदिवासींचे शिष्टमंडळ भेटणार नाही. राज्यपालांना आदिवासींच्या हिताचा निर्णय घेण्याचा संविधानिक मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे सर्व आदिवासी संघटना एकत्रित आदिवासींची कैफियत राज्यपालांसमोर मांडणार आहेत, असेही पिचड म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMadhukar Pichadमधुकर पिचडAkoleअकोले