वाकचौरे हे मोटारसायकलवरून चालले होते. राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील रेल्वे बोगद्याजवळ त्यांना मोटारसायकल चालविताना अचानक चक्कर आली. त्यांनी रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करून येथेच थोडा वेळ झोप घेतली. सुमारे दीड तासाने ते झोपेतून उठल्यानंतर त्यांना त्यांची मोटारसायकल दिसली नाही. दुसऱ्या दिवशी वाकचौरे व त्यांचा भाचा विजय बाळासाहेब वाघ हे चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेत असताना देसवंडी येथील लोखंडी पुलाजवळ आरोपी नागेश गुजर हा बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटिना मोटारसायकल (एम. एच. १७, सी. एल. ०६३३) ही मोटारसायकल देसवंडी ते कोंडवड जाणारे रोडवरुन घेऊन जाताना त्यांना दिसला. त्याला थांबण्यासाठी आवाज दिला असता तो त्यांना पाहून तेथून निघून गेला. सोन्याबापू वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST