शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीजवळ मोटारसायकल-पिकअपचा अपघात; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:11 IST

राहुरी : राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर नगर-मनमाड रोडवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या ...

राहुरी : राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर नगर-मनमाड रोडवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विरुद्ध दिशेने जाणा-या पिकअप व्हॅनने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे़ त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.राहुरीकडून नगरच्या दिशेने हे दोघे तरुण मोटारसायकल (क्रमांक एमएच- १७, एल ९७९३) वरुन जात होते. त्यांची मोटारसायकल राहुरी कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर आली असताना विरुद्ध दिशेने जाणा-या एमएच-१७, टी-७५८० या पिकअपने या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघाही तरुणांच्या डोक्याला मार लागला आहे. एका तरुणाच्या डोक्यातून व नाकातून रक्त वाहत होते. हात-पाय फ्रॅक्चर झाल्याचे दिसत होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलावून दोघांनाही नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यातील एकाजणाची प्रकृती गंभीर आहे. संबंधित अपघातग्रस्त पिकअप व्हॅन राहुरी विद्यापीठाच्या सेवेत असून, ही पिकअप व्हॅन रोज अशीच विरुद्ध दिशेने जाते आणि पुढे काही अंतरावर गेल्यानंतर टर्न घेऊन विद्यापीठात जाते, असे स्थानिकांनी सांगितले. या पीकवरही राहुरी कृषी विद्यापीठ असे लिहिलेले आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे अद्याप समजली नाहीत. जखमी तरुण वरवंडी (ता. राहुरी) येथील असल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीAccidentअपघात