शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविले मुलाचे प्राण,संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावच्या महादेव वस्तीवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 17:58 IST

  संगमनेर : पायात भरलेला काटा काढण्यासाठी खाली वाकलेल्या सात वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला शेतात ओढत नेले. या मुलाच्या आईने बिबट्याच्या मागे धाव घेत आरडाओरड सुरू केली. बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवत त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी (१९ मार्च) रात्री नऊ च्या सुमारास तालुक्यातील सुकेवाडी गावच्या शिवारात महादेव वस्ती येथे घडली.

  संगमनेर : पायात भरलेला काटा काढण्यासाठी खाली वाकलेल्या सात वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला शेतात ओढत नेले. या मुलाच्या आईने बिबट्याच्या मागे धाव घेत आरडाओरड सुरू केली. बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवत त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी (१९ मार्च) रात्री नऊ च्या सुमारास तालुक्यातील सुकेवाडी गावच्या शिवारात महादेव वस्ती येथे घडली.    सुनिल नामदेव चव्हाण असे बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या मुलाचे तर सुरेखा चव्हाण असे या मुलाच्या आईचे नाव आहे. सुनिलला शौचास लागल्याने सुरेखा या त्याला घेऊन घराबाहेर गेल्या होत्या. येताना सुनिलच्या पायात काटा भरला, तो काढण्यासाठी खाली वाकलेल्या सुनिलवर झाडाझुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. जबड्यात त्याची मान धरत जवळच असलेल्या शेतात ओढत नेले.    बिबट्या मुलाला जबड्यात धरून नेत असल्याचे पाहिल्यानंतर सुरेखा यांनी त्याच्या मागेधाव घेत मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक  आवाजाच्या दिशेने धावत गेले. नागरिकांच्या ओरडण्याच्या आवाजाने बिबट्याने सुनिलला तेथेच टाकून पळ काढला. सुनिलची मान, हात, पाय व पोटाला बिबट्याचे दात व नखे खोलवर लागल्याने जखमा होवून त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. गंभीर जखमी झालेल्या सुनिलला उपचारार्थ शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपाल अंबादास मेहेत्रे, प्रशांत पुंड यांनी तात्काळ रूग्णालयात व घटनास्थळी भेट दिली. सुनिलची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांच्या मागणीवरून परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.--------------फोटो बट्याच्या हल्यात जखमी झालेला सुनिल चव्हाण.ओळ : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात लावण्यात आलेला पिंजरा.