शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सास-याला मारहाण; चौघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:26 IST

पत्नीच्या माता-पित्यांना मारहाण करणा-या जावयासह चौघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे़

अहमदनगर : पत्नीच्या माता-पित्यांना मारहाण करणा-या जावयासह चौघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे़. जिल्हा न्यायाधीश ए.एम़.शेटे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. पावलस कचरू गायकवाड (रा़ खरवंडी कासार,), संजय छबू हिवाळे (रा़ चेंबूर, वाशिनाका मुंबई), पेतरस कचरू गायकवाड व योहान कचरू गायकवाड (रा़ खरवंडी कासार ता़ पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील रहिवासी वृषाली किसन ठुबे हिचा १३ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपी पावलस कचरू गायकवाड याच्यासोबत विवाह झाला होता. पावलस हा वृषालीला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने तिने आरोपीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पावलस व इतर तिघा आरोपींनी ३ डिसेंबर २०१४ रोजी वृषाली हिच्या घरी जाऊन तिच्या चुलत भावास धक्काबुक्की करत त्याला घरात कोंडून टाकले. तसेच यावेळी वृषालीचे आई-वडील किसन विष्णू ठुबे व मंदा ठुबे यांना मारहाण केली़. यावेळी आरोपींनी वृषाली हिला जबरदस्तीने वाहनातून घेऊन गेले. याप्रकरणी वृषाली हिचा चुलत भाऊ भानुदास विठ्ठल ठुबे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक एस़आऱ जांभळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली़. या गुन्ह्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ पुष्पा गायकवाड यांनी काम पाहिले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी